...

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करत खासदार चिखलीकर साधतायेत शेतकऱ्यांशी संवाद

नांदेड Nanded news : जिल्ह्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी ढगफुटी (Nanded district heavy rainfall) होऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (MP Pratap Patil Chikhalikar) हे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देत आहेत.

 

दरम्यान, खासदार चिखलीकर अर्धापुर तालुक्याच्या (Ardhapur Taluka) दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.  (MP Pratap Patil Chikhalikar)

 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) खरिपाच्या खूप मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानाची खासदार चिखलीकर हे बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur Taluka) अतिवृष्टीमुळे (Heavy rains) बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

 

 

प्रशासन सध्या नदीच्या काठावर असलेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. अजिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Nanded district heavy rainfall) खरिपाच्या खूप मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांना खूप मोठा फटाका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटाका बसणार आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून, हीच मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.  (Heavy rains)

 

 

चिखलीकर यांनी अर्धापूर तालुक्यातील (Ardhapur Taluka) शैलगाव, सांगवी, मेढला, खडकी कोंढा, सावरगाव, देळुब आदी गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी धर्मराज देशमुख, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, बाबुराव हेंद्रे, निलेश देशमुख, तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, अवधूत कदम, सुधाकर कदम, सखाराम क्षीरसागर, नागोराव भांगे, अमोल कपाटे, जठन मुळे, संतोष पवार, तुळशीराम बंडाळे, नायब तहसिलदार मारोतराव जगताप, तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, मंडळ अधिकारी संजय खील्लारे, शेख शफियोदिन, संजय चतरमल, एस.पी.गोखले, विश्वनाथ मुडकर आदी उपस्थित होते.

Local ad 1