Cotton । कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन

राज्यात सध्या कापूस पिक पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत असून पहिली वेचणी सुरु आहे. काही तुरळक ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यस्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव २ ते ३ टक्के पर्यंत आहे, मात्र हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (How to manage pink bond larvae on  cotton)

 

 

गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र

गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पात्या, फुले व बोंडावर लांबुळकी चपटी, मोत्यासाखी चकचकीत पांढरी अंडी घालतात. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते. अंडयातून बाहेर पडल्यावर अळी सुरुवातील पात्या, फुलांचे नुकसान करते व पुढील अवस्थेत बोंडात शिरते व आतील सरकी व कापूस खाऊन उपजीविका करते. (How to manage pink bond larvae on cotton)

 

नऊ महिन्यांत 51 डीपी जाळले ; ग्रामस्थ धडकले महावितरण कार्यालयावर

 

गुलाबी बोंड अळीचे पतंग निशाचर असल्यामुळे रात्री (१२.०० ते ४.०० वा. दरम्यान) मिलन होऊन ते अंडी घालतात या प्रक्रियेत गडद अंधाऱ्या रात्रीत जास्त वाढ होते व त्यानंतर तीन ते चार दिवसात या अंडयातून अळ्या बाहेर पडतात. या किडीच्या वाढीसाठी दिवसाचे तापमान २९० ते ३२० से. व रात्रीचे तापमान ११० से. ते १४० से. तर दिवसाची आर्द्रता ७१ ते ८० टक्के तर रात्रीची आर्द्रता २६ ते ३५ टक्के अत्यंत पोषक आहे. असे वातावरण ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात अपेक्षीत आहे व तसेच कपाशीचे १५ ते २० दिवसाचे बोंड हे गुलाबी बोंड अळीचे आवडते खादय आहे. या सर्व कारणांमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. (How to manage pink bond larvae on cotton)

 

 

असे करा व्यवस्थापनाच्या उपाययोजना 

१. एकरी दोन याप्रमाणे पिकाच्या उंचीच्यावर एक फुट याप्रमाणे फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
२. प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे यांची संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खालील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.  (How to manage pink bond larvae on cotton)

 

५ ते १० टक्के प्रादुर्भाव असल्यास :

इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के दाणेदार ३.८ ते ४.४ ग्रॅम किंवा इथिऑन ५० टक्के प्रवाही १५ ते २० मि.ली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही ५. ५ मि.लि. किंवा फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही ५.५ मि.लि. किंवा सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही ७.६ मि.लि. या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

 

 

१० टक्के च्यावर प्रादुर्भाव असल्यास :

आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणुन खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रॉनिलीप्रोल ९.३ टक्के + लॅब्डासायहॅलोथ्रीन ४.६ टक्के – ५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के – २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + अॅसीटामाप्रिड ७.७ टक्के – १० मिली.

 

 

3. सदयपरिस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पिक चार ते पाच फुट उंचीचे असुन पिकाच्या फांदया दाटलेल्या आहेत अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते म्हणुन कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाने फवारणी किटचा वापर करूनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी.

विकास पाटील
कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Local ad 1