...

कार्यकर्त्यासाठी राजकीय नेता जीव की प्राण असतो..? कार्यकर्त्यावर वेळ आल्यास पुढे काय होत..? कार्यकर्त्यांनी कसं वागल पाहिजे..? शिवा नरंगले यांची पोस्ट व्हायरल…

नांदेड : राजकीय नेत्यांना मोठ करण्यात मोलाचा वाटा हा गाव-वाडी-वस्तीवरील कार्यकर्त्यांचा असतो. आपला नेता कार्यकर्त्यासाठी जीव की, प्राणच..नेत्याचा आदेशापेक्षा इतर कोणतेही काम महत्वाचं नसतं. (घरातील कितीही महत्वाच काम असलं तरी) नेत्याला घरातील सदस्यांपेक्षाही अधिक जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यावर वेळ आल्यानंतर नेता साधी विचारपूसही करत नाही. (काही अपवाद वगळता) असा अनुभव अनेक कार्यकर्त्यांना आलेला असतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणाला किती महत्व द्यावे.. त्यांने काय काळजी घेतली पाहिजे… यावर वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवा नरंगले (Shiva Narangale, Nanded district president of Vanchit Bahujan Aghadi) यांनी फेसबुकवर एकपेस्ट केली आहे.(How political workers should behave.. Shiva Narangale post viral…)

 

या पोस्टवर अनेकांनी मत व्यक्त करत सहमती दर्शवली आहे. मात्र, यातील अनेक कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांना जय महाराष्ट्र करुन आपला व्यवसाय सुरु केला आहे. तर काही अजूनही साहेब..दादा..भाऊ म्हणत कार्यकर्त्या म्हणून काम करत आहेत. काहींनी आलेले अनुभव कमेंटमध्ये मांडले आहेत. (How political workers should behave.. Shiva Narangale post viral…)

शिवा नरंगले लिहितात..

कार्यकर्ता आयूष्यभर आपलं घर, लेकर सोडून वणवण भटकत असतो. राजकारणाच्या नादात आयुष्य कधी निघूल गेल हे त्याला कळत नसतं. तारूण्यात लाथ घालीन तिथं पाणी काढीन अशी धमक त्याच्यात असते. पण तो जेव्हा उतार वयात तो अंथरणात पडतो, तेव्हा त्याला पश्चाताप होतो. शेवटी आपलं कोणीच नसतं, चलतीच्या काळात मागेपूढे करणारे पण दवाखान्यात भेटायला पण येत नाहीत. ऐकेकाळी ज्या राजकीय कार्यकर्त्याच्या भोवती गर्दी असायची ते कार्यक्रते जेव्हा आयूष्याची शेवटची घटका मोजत असतात तेव्हा फक्त आणी फक्त त्यांच कूटूंबच सोबत असतं. ह्या दोन महीण्यात दोन नेत्यांचा शेवटचा संघर्ष बघून खूप वाईट वाटतय ,कार्यकर्ता होण सोप नाही, माझी सर्वांना विनंती आपल शरीर, आपल कूंटूब, आपली परीस्थीती सांभाळून राजकारण करा, दूनिया रोज बदलत असते याची जाणीव ठेवा,पैसेवाल्याच्या नादाला लागून ग्रामपंचायत निवडणूकीत बरबाद होऊ नका, जत्रा करायला सर्वच येतात. पण शेवट आपल्यालाच करावा लागतो हे लक्षात ठेवा.. पुढच्याला ठेच मागचा शहाणा त्यामुळे विचारपूर्वक वागा ही नम्र विनंती.!

 

 

 टिप : आताच ऐका नेत्याला दवाखान्यात भेटून आलो व भावनिक झालो म्हणून ही पोस्ट केली काही चुकलं असेल तर माफ करा धन्यवाद (शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजता केलेली पोस्ट) (How political workers should behave.. Shiva Narangale post viral…)

 

 

Local ad 1