राज्यात वर्षभरात कुठे किती होईल पाऊस ; पेरणी कधी करावी यावर हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली महत्वाची माहिती

पुणे. राज्यामध्ये यंदा जून ते जुलै या दोन महिन्यात कमी पाऊस असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात चांगला पाऊस होईल. जून महिन्यात राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागात पाऊस लांबण्याची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पावसाची शक्यता आहे. तरीही जमीन पुरेशी ओलीत झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करु नये. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी पाऊस चांगला असला तरी कुठे जास्त, तर कुठे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणी करताना घाई करु नये, असा सल्ला ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे (Meteorologist Dr. Ramchandra Sable) यांनी दिला आहे. (How much rain will happen in which district in Maharashtra in a year?)

दरवर्षीपेक्षा यंदा अवकाळी सुद्धा जोमात बरसला तरीही उन्हाळ्यातील तापमान जास्त आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाले असले तरी त्याला पोशख वातावरण नसल्याने पुढे सरकायला वेळ लागेल. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल. परंतु सुरुवातीला पाऊस झाले तरी त्यामध्ये नंतर खंड पडणार असून, भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्यासाठी शेतकर्‍यांनी घाई करु नये. यंदा कोकणात चांगला पाऊस होईल, त्याचे भात पिकाचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर या काळात जास्त पाऊस होईल. वार्‍याचा वेग, तापमान, सापेक्ष आर्द्रता याचा विचार करता पावसाला आवश्यक असणारी परिस्थिती कमी आहे. त्यामुळे यंदाही पावसाळा साधारण राहण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पडणार खंड …

वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाची कालावधी व तापमान कमी आढळल्याने यंदा जून, जुलै महिन्यांत धुळे, जळगाव, कराड, सोलापूर, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही येथे पावसामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तर दापोली, पुणे, कोल्हापूर, अकोला, नागपूर व परभणी येथे पावसाची खंड पडण्याची कलावधी कमी राहणार आहे, असा अंदाज आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण हे जास्त राहील. परिणामी याचा परिणाम पिकावर होऊ शकतो.

धूळवाफ पेरणी करु नका…

वार्‍याचा वेग कमी असला तरच पावसाला पोशख वातावरण तयार होते. परंतु आता वार्‍या वेग ताशी ४० ते ५० किमी आहे. त्याचा फटका पावसाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी धूळवाफ पेरणी करु नये. त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकर्‍यांनी जमीन ६५ मिलीमीटर ओलीत झाल्याशिवाय पेरणी करु नये. तसेच सरासरी पाऊस समाधानकारक असला तरी तो ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांत होणार आहे. त्यामुळे जून, जुलै महिन्यात पावसात खंड पडणार आहे. त्यामुळे पेरणीसाठी घाई करु नये.
डॉ.रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्

Local ad 1