नांदेड ः जूनमध्ये झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करुन घेतली. परंतु त्यानंतर पवसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट गडद होत होते. त्यातच पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत किनवटमघ्ये सर्वाधिक 74 मीमी तर सर्वात कमी माहुर तालुक्यात 21 मीमी पावसाची नोंद झाली. तसेच इतर तालुक्यात पिकांना जिवनदान मिळेल, असा पाऊस झाला आहे. त्यामुळे काही प्रमाणात दुबार पेरणीचे संकट टळले. How much rain fell in Nanded district
गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी पोषख वातावरण नव्हते. दरम्यान 11 जुलैनंतर सर्वदुर पाऊस होईल, तोपर्यंत पावसाची प्रतिक्षा करावी लागेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. परंतु राज्यात काही ठिकाणीच पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यात किनवट तालुक्यात सर्वांधिक म्हणजेच 74 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या लगत असलेल्या माहूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच 21 मीमी पावसाची नोंद झाली आहे. How much rain fell in Nanded district
Related Posts