Junglee Rummy । अजय देवगणजी जंगली रम्मी खेळून किती पैसे जिंकलात ? आम्हांलाही सांगा !
मुखेड तालुक्यातील तरुणाचे अभिनेता अजय देवगणला पत्र
Junglee Rummy । मुखेड : टीव्ही आणि ऑनलाइन साईटवर अभिनेता अजय देवगण (Actor Ajay Devgn) आणि इतर सेलिब्रिटी जंगली रम्मीची जाहिरात करतो. या ऑनलाईन रम्मी खेळून खेळून अनेक तरुण बरबाद झाले आहेत. ज्यादा पैसे मिळतील या अपेक्षेने जंगली रम्मी ऑनलाईन खेळतात. मात्र, त्याचा फायदा होत नाही. या संदर्भात मुखेड तालुक्यातील तरुणाने अभिनेता अजय देवगणला पत्र लिहून आपण यातून किती पैसे कमावले, आम्हाला जाणून घ्यायचं आहे, असे पत्र अजय देवगणच्या घरच्या पत्यावर पाठवले आहे. (How much money did Ajay Devgananji win playing junglee rummy?) त
अजय देवगणला पाठवलेलं पत्र
अभिनेता अजय देवगण,
5/6, शीतल अपार्टमेंट, भूतल, चंदन सिनेमा समोर, जुहू, मुंबई,
विषय : आपण ज्या जंगली रम्मी ऑनलाईन गेमची जाहिरात करता तेच जंगली रम्मी ऑनलाईन गेम खेळून तुम्ही आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे हे महाराष्ट्रातील नवतरुण व कर्जबाजारी तरुणांना आपल्याकडून जाणून घेण्याची इच्छा असले बाबत.
महोदय,
अभिनेता अजय देवगण स. नमस्कार व राम राम आपण एक अतिशय उत्तम अभिनेता आहात.
“आपले अनुकरण करणारे महाराष्ट्रात अनेक लाखो नवतरुण आहेत. हे तुमच्यासाठी अभिमानाची व तेवढीच जबाबदारीची गोष्ट आहे. आज काल सोशल मीडियाचा खुप सारे नवतरुण उपयोग करत आहेत. नवतरुणांना चांगली दिशा देण्याचे काम आपल्यासारख्या अभिनेत्यांने सोशल मीडियावर (Social media) केले पाहिजे. पण सोशल मीडियावर आपली जंगली रम्मी या ऑनलाईन गेमची जाहीरात पाहून अनेक नवतरुणांना या गेम खेळण्याची जनु सवयच लागली. व याच सवयीमुळे अनेक तरुण कर्जबाजारी झाले आहेत? त्यामुळे अनेक तरुणांना प्रश्न पडला आहे की, आपण जंगली रम्मी हा ऑनलाईन गेम खेळून आजपर्यंत किती पैसे जिंकलेले आहे. व जाहीरातीचा उद्देश काय आहे, हे महाराष्ट्रातील तरुणांना सांगितले पाहिजे. व नवतरुणांना जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे आपण फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे सर्व आपण सांगितले पाहिजे. जर ह्याच गेमला काही राज्यात बंदी आहे. आपण मात्र बिंदास्त जाहिरात करता. महाराष्ट्रातील तरुणांना हा जंगली रम्मी गेम किती फायद्याचा आहे. हे पण आपण सांगितले पाहिजे. आणी हाच गेम तुमच्या आजुबाचे किती मान्यवर खेळतात हे पण आपण पाहीले पाहिजे. कारण ग्रामीण भागातील नवतरुणांना चांगल्या गोष्टीचे मार्गदर्शन करणारे खूप कमी लोक आहेत. त्यातच तुम्ही अशे जाहीराती करून नवतरुणांना काय संदेश देत आहोत हे पण सांगितले पाहिजे. फक्त जाहिरात करून पैसेच कमविण्याचा उद्देश असेल तर हाच उद्देश किती योग्य आहे. या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा व आपण ही जाहीरात बंद करावी व नवतरुणांना चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावे ही विनंती”.
आपलाच,
- विलास प्रतापराव शिंदे (Vilas Shinde )
मु. पो. वसूर ता.मुखेड जिल्हा नांदेड.