दुष्काळग्रस्तांना केंद्राकडून निधी किती मिळणार ? केंद्राच्या पथकाला पाहणीत काय मिळाले ?

पुणे : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought declared in 40 talukas of Maharashtra) करण्यात आला आहे. त्याच दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय दुष्काळ पथकाची पाहणी पूर्ण झाली आहे. या पाहणीचा अहवाल तीन दिवसांमध्ये केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडून मिळण्याची शक्यता आहे. (How much funds will the drought sufferers get from the central government?)

 

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यानंतर या पथकाने पुणे विभागीय आयुक्तालयात (Pune Divisional Commissionerate) शुक्रवारी सकाळी अकरा वाजता राज्यस्तरीय आढावा बैठक घेतली. त्यामध्ये राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, विभागीय आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्तालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन आयुक्तालय, पाणीपुरवठा विभाग आदी अधिकारी उपस्थित होते.

 

 

राज्याने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावात नमूद केल्यानुसार खरोखरच भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. पुढील दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटींची मदत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

 

दरम्यान, केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांचे विविध गट करण्यात आले होते. या गटांनी राज्यभरातील दुष्काळी भागाला भेट दिली. पुणे विभागासह राज्यातील इतर ठिकाणच्या दुष्काळाबाबत राज्याने केंद्राला पाठविलेल्या प्रस्तावात जी वस्तुस्थिती मांडली होती, ती परिस्थिती केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला प्रत्यक्ष पाहणीत दिसून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Local ad 1