...

नांदेड महापालिका क्षेत्रातील रेडी रेकनर किती वाढले ? नांदेड शहरात घर, जमीन खरेदी महागली !

पुणे : आजपासून म्हणजेच 1 एपिल ते 31 मार्च 2026 पर्यंत राज्य शासनाकडून वार्षिक बाजारमूल्य (Annual market value) दरात म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच ही वाढ करण्यात आली असून, नांदेड-वाघाळा महापालिका क्षेत्रातील (Nanded Waghala Municipal Areaनवीन दरांमध्ये 3.18% ची वाढ झाली आहे. त्याची अंमलबजावणी आजापासून होणार आहे. (How much did the ready reckoner increase in Nanded)

 

Ready Reckoner Rate : घर, जमीन खरेदीच्या किंमती आजपासून  वाढल्या ; रेडीरेकनकरच्या दरात घसघसीत वाढ

 

 

नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने (Registration and Stamp Duty Department) सरासरी दहा टक्के वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र, या प्रस्तावाला मान्यता देताना सरासरी कमी वाढ मान्य करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण क्षेत्रात ३.३६ वाढ करण्यात आली असून नगरपरिषद आणि नगर पंचायत क्षेत्रात ४.९७ टक्के, महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) ५.९५ टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याची (मुंबई वगळता) सरासरी वाढ ४.३९ टक्के एवढी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

आधी लोकसभा त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. परंतु आता कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे रेडी रेकनरच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. विशेष म्हणजे राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सरासरी 10 टक्के वाढ सुचवली होती. मात्र, राज्य शासनाने हा  प्रस्ताव फेटाळले आहे. सरासरी ही वाढ ४.३९ टक्के करण्यात आली आहे. तर राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ५.९५ टक्के वाढ करण्यात आली असून, ग्रामीण भागात ३.३६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

 

Local ad 1