कंधार पंचायत समितीचे किती गण होणार आरक्षित?

कंधार : जिल्हा परिषद गट आणि गंणाची प्रारुप रचनेच काम सुरु आहे. प्रारुप रचना अंतिम झाल्यानंतर आरक्षण निश्चित होणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षण (OBC reservation) विना होत असून, आता अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीसाठी  (Scheduled Castes and Scheduled Tribes) आरक्षण काढले जाईल.पंचायत समितीच्या 14 गणांपैकी किती आरक्षित होतील, याकडे लक्ष लागले आहेत. (How many groups of Kandhar Panchayat Samiti will be reserved?)

 

 

कंधार तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट (Seven groups of Zilla Parishad) असून, पंचायत समितीचे 14 गण (14 groups of Panchayat Samiti) निश्चित झाले आहेत. तालुक्यात 2 लाख 24 हजार 27 लोकसंख्या आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती 47 हजार 195 आणि अनुसूचित जमातीचे सात हजार 232 नागरिकांची संख्या आहे. महिलांना 50 टक्के आरक्षणानुसार 14 पैकी 7 गण महिलांसाठी आरक्षित होणार हे निश्चित आहे. (How many groups of Kandhar Panchayat Samiti will be reserved?)

 

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रानुसार कंधार तालुक्यात अनुचित जातीसाठी 2.94 म्हणजेच तीन गण आरक्षित होण्याची शक्यता आहे. तर अनुसुचित जामातीसाठी 0.45 येत असून, एका जागेसाठी 0.50 किंवा त्यापेक्षा अधिक आल्यास गण आरक्षित होऊ शकते. (How many groups of Kandhar Panchayat Samiti will be reserved?)

आरक्षण निश्चितीचे सूत्र

  ग्रामीण क्षेत्रातील एकूण गुणोत्तराला एकूण गट संख्येने गुणले जाईल. त्यानंतर येणारा आकडा त्या प्रवर्गासाठी आरक्षित गटांचा किंवा गणाचे असेल. (How many groups of Kandhar Panchayat Samiti will be reserved?)

 उतरत्या क्रमाने आरक्षणास प्राधान्य

 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे आरक्षण करताना ज्या ठिकाणी जुने कधीच आरक्षण आले नाही, त्या गटाला प्राधान्य दिले जाणार आहे. पहिल्यांदा सूत्र अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील लोकसंख्येची गटनिहाय उतरत्या क्रमाने लोकसंख्या निहाय यादी केली जाईल. त्यानंतर प्राधान्यक्रमानुसार लोकसंख्येवर आरक्षण निश्चित केले जाणार आहे. पूर्वी संबंधित गटांमध्ये आरक्षण आले असल्यास  ते सोडून अन्य लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी हे आरक्षण दिले जाईल.
Local ad 1