Nanded corona update । नांदेड जिल्ह्यात रविवारी किती आढळले जाणून घ्या..

Nanded corona update । नांदेड : रविवारी नांदेड शहर आणि जिल्ह्यात दोन हजार 12 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील तब्बल 786 जण बाधित आढळले आहेत. यामध्ये 412 जण नांदेड महापालिका क्षेत्रातील आहेत. तर उर्वरीत ग्रामीण भागातील. तसेच 507 जण कोरोनातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरटीपीसीर चाचणीद्वारे 548 आणि 138 जण अॅनटीजन  चाचणीतून बाधित आढळले आहेत. (How many corona infected patients were found in Nanded district today?) 

 

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 12 अहवालापैकी 786 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 648 तर अँटिजेन तपासणीद्वारे 138 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 495 एवढी झाली असून यातील 91 हजार 508 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 329 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 392, नांदेड ग्रामीण 49, भोकर 7, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 5, हदगाव 10, किनवट 36, लोहा 3, मुदखेड 20, मुखेड 13, उमरी 16, माहूर 35, परभणी 26, हिंगोली 8, लातूर 1, अकोला 1, नागपूर 2, हैद्राबाद 4, तेलंगणा 1, पुणे 1, वाशीम 1, राजस्थान 2, बुलढाणा 3, यवतमाळ 2, उमरखेड 1, औरंगाबाद 3, निजामाबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, बिलोली 19, किनवट 2, मुखेड 21, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 20, लोहा 3, नायगाव 6, अर्धापूर 8, धर्माबाद 17, माहूर 2, उमरी 5, भोकर 2, हदगाव 5, मुदखेड 3 असे एकुण 786 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 432, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 2 असे एकुण 507 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 921, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 338, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 33, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 329  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

Local ad 1