पुणे ः कोरोनाची तिसरी लाट काही प्रमाणात थोपविण्यात यश आले असले तरी कोरोना अजूनही गेलेला नाही. राज्यात आजघडीला एक लाख 67 हजार 927 रुग्ण उपचार घेत आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये पाच अंकी संख्या म्हणजेच दहा हजारांपेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आहेत. लाॅकडाऊउनमध्ये काहीप्रमाणात शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून घरात असलेले नागरिक पुन्हा बाहेर आले आहेत. मात्र,आता काळजी घेतली नाही. तर पुन्हा कोरोना वाढण्याचा धोका कायम आहे. How many corona are affected in Nanded?
दररोज एकूण चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या कोरोनाधित रुग्णांचा दर लक्षात घेऊन राज्य शासनाने लाॅकडाऊनमध्ये शिथिलती दिली आहे. त्यात पाच स्तर निश्चित करण्यात आले. पहिल्या स्तरात राज्यातील 18 जिल्ह्यांचा समावेश असून, त्या ठिकाणी लाॅकाऊन पुर्णपणे उठविण्यात आला आहे. तर अजूनही पुणे, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात काहीप्रमाणात निर्बंध आहे. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात असून, 20 हजार 747 रुग्णांवर घरी आणि रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मुंबईमध्ये 17 हजार 642, ठाणे 15 हजार 724, कोल्हापूर जिल्ह्यात 18 हजार 551 तर सातारा जिल्ह्यात 12 हजार 461 सक्रीय रुग्ण आहेत. सहा जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या पाच ते दहा हजारांच्या आत असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाच हजारांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. How many corona are affected in Nanded?