कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग काही काळासाठी थांबले (Lockdown) होते. त्याचे परिमाण मोठ्या प्रमाणात झाल्याचे विविध सर्व्हेक्षणातून (OECD’ survey) समोर आले. काही परिमाण अल्पकाळासाठी तर काही दिर्घकाळ परिमाण करणारे आहेत. कोरोना काळातील शिक्षणाचा दर्जा कसा आहे, यासंदर्भात एका सर्व्हेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. (How is the quality of education in Corona era?)
मीडिया रिपोटनुसार, ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटचा (Organization for Economic Co-operation and Development -OECD] ) अहवालानुसार प्रत्येक चौथा विद्यार्थी वाचन,गणित, विज्ञानात कमकुवत झाला आहे. त्यामुळे तुमची मुलं जर कोरोनाकाळात प्राथमिक शिक्षण घेणारे असतील तर, त्यांची गुणवत्ता तपासून घ्या.
मीडिया रिपोटनुसार (Media report), ओईसीडी ही संस्था पॅरिस (Paris) येथील संघटना असून, सन 2018 च्या तुलनेत शालेय विद्यार्थ्यांची वाचनक्षमता 10 टक्क्यांनी तर गणितातील क्षमता 15 टक्क्यांनी घटली. तर प्रत्येक चौथ्या मुलाची बौद्धिक क्षमता घटल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.
जर्मनी, नेदरलँड, नाॅर्वे, पोलंड (Germany, Netherlands, Norway, Poland) या देशातील मुलांमध्ये गणित विषयाबद्दल विशेष रुची आढळून आली. मात्र, अनेक देशांमध्ये हा स्तर विशेषतः कोरोनानंतर घसरत चालला असल्याचे या संशोधनातून समोर आले. कोरोनाचा शालेय शिक्षणावर विपरीत परिणाम झाल्याने त्याचे तोटे जाणवत असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.
ओईसीडीने जगभरातील 81 देशातील सात लाख विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. मात्र, मोबईलवर शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत घट झाल्याचे निष्कर्ष समोर आले. त्यामुळे तुमचे मुलं जर मोबईलद्वारे ऑनलाइन शिक्षण घेतले असतील तर त्यांची गुणवत्ता तपासून घ्या….