पुण्यात घरांच्या किमती वाढल्याने घर खरेदीत 5 टक्क्यांनी घट

घरांच्या किमती सलग पाचव्या वर्षी वाढल्या आहेत. आधीच उंचावलेल्या आधारावर, संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्के वाढून 6 हजार 590 रुपये प्रति चौरस फूट या उच्चांकावर पोहोचले आहे. विकासकांनी बाजारात आणलेल्या इन्व्हेंटरी मध्ये घट झाल्यामुळे विक्रीतील मंदी आली. एकूण विक्री 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 1.03 लाख घरांवरून 2023 मध्ये सुमारे 94,500 घरे आणि 2024 मध्ये सुमारे 90,000 घरांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.