होट्टल सांस्कृतिक महोत्सव तीन दिवस रंगणार

नांदेड : जिल्ह्यातील चालुक्यीन परंपरेचा वारसा लाभलेले, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा (Maharashtra, Karnataka, Telangana) राज्यांच्या सिमावर्ती भागात असलेल्या होट्टल नगरी येथील महोत्सवाची परंपरेचे हे तीसरे पुष्प एप्रिल 2022 मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Maharashtra Tourism Directorate) व नांदेड जिल्हा प्रशासन  (Nanded District Administration) यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे गुंफले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन 9, 10 व 11 एप्रिल 2022 रोजी पर्यटन संचलनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जाहिर करण्यात आले आहे. (The Hottel Cultural Festival will be held for three days)

 

 

होट्टल सांस्कृतिक महोत्सव 2022 (Hottel Cultural Festival 2022० च्या नियोजनात्मक आयोजनाकरीता स्थानिक स्तरावर विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 22 मार्च 2022 रोजी महोत्सव आयोजनाच्या प्राथमिक बैठकीत हे निर्देश दिले होते. (The Hottel Cultural Festival will be held for three days)
या समित्यांमध्ये मुख्य नियंत्रण समिती, स्वागत समिती, व्यासपीठ-मंडप-स्टॉल उभारणी समिती, सुरक्षा समिती, प्रसिद्धी व वार्तांकण समिती, निमंत्रण पत्रिका समिती, सांस्कृतिक व कार्यशाळा कार्यक्रम समिती, भोजन व जलपाण व्यवस्थापन समिती, नियामक समिती, वैद्यकीय सेवा-स्वच्छता समिती यांचा समावेश आहे. या समित्यांचे संचलन सुयोग्यरित्या करण्यासाठी समिती प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या आदेशात नमूद करण्यात आलेल्या समित्यांसमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी देखील समिती प्रमुखांवर देण्यात आली आहे.
समिती प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना या कामी नियुक्त करावयाचे आहे. नियुक्तीचे आदेश, त्यात केलेले बदल, बदललेले भ्रमणध्वणी क्रमांक या अनुषंगाने वेळोवेळी मुख्य नियंत्रण समितीच्या निदर्शनास आणून द्यावेत. यात कुठलीही नियुक्ती नियमबाह्य व परस्पर होणार नाही याची समिती प्रमुख यांनी खात्री करावी. (The Hottel Cultural Festival will be held for three days)
प्रत्यक्ष महोत्सवाच्या तारखा म्हणजे 9 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत सर्व समिती प्रमुखांनी त्यांच्या समिती मधील आदेशाव्यतिरिक्त जास्तीत-जास्त 10 अधिकारी-कर्मचारी (प्रती समिती) यांची नियुक्ती होट्टल येथील कार्यक्रम स्थळी करावी. त्याबाबत मुख्य समिती व भोजन-जलपान व्यवस्था समिती यांना 5 एप्रिल 2022 पूर्वी अवगत करण्याची तसदी घ्यावी, जेणेकरून व्यवस्थापनातील एकसंघता कायम राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. (The Hottel Cultural Festival will be held for three days)
समितीचे सदस्य व समितीकडे सोपविण्यात आलेले कार्य पुढील प्रमाणे आहेत. यात मुख्य नियंत्रण समितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे या समितीचे प्रमुख असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी, औरंगाबाद पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी एस. के. आडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी प्रशांत तातोडे, उपचिटणीस मकरंद दिवाकर हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी आवश्यक ती समिती स्थापन करणे, कार्यक्रमासाठी आवश्यक निधी संकलनाचे काम, कार्यक्रमाचे आयोजन निश्चित करणे, प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाचे आदेश निर्गमीत करणे, निधी संकलनासाठी आमदारांची मान्यता प्राप्त करून घेणे, विविध विषयांच्या निविदा प्रक्रिया अंतिम करणे, नियोजीत कार्यक्रमासाठी मुंबई येथील पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक यांची परवानगी घेणे, नियोजन विभागाकडील निधी मंजुरी संबंधाने पत्रव्यवहार व मंजुरी प्राप्त करून घेणे, लेखे संबंधाने संकलन व अनुषंगीक कामे करणे ही आहेत.

 

 

स्वागत समितीचे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी हे प्रमुख आहेत तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, देगलूरचे तहसिलदार राजाभाऊ कदम हे सदस्य आहेत. या समितीचे कार्यात कार्यक्रमासाठी निमंत्रित करावयाच्या प्रमुख पाहुण्यांची नावे त्यांच्या तारखा, संपर्क निश्चित करणे. कार्यक्रम आमंत्रण पत्रिका निश्चित करणे, सन्मान चिन्हे निश्चित करणे, विहित काळात निश्चितपश्चात व छपाई आणि वितरणासाठी निमंत्रण पत्रिका समिती यांच्याकडे हस्तांतरण करणे, कार्यक्रमाचे मिनिट टू मिनीट नियेाजन करणे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रण पत्रे देणे, कार्यक्रमस्थळी प्रमुख पाहुण्यांचे आगमन, स्वागत समारंभाचे नियोजन, मान्यवरांना द्यावयाचे स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ संबंधी नियेाजन, प्रत्यक्ष उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे आयोजन करणे आहेत. (The Hottel Cultural Festival will be held for three days)
Local ad 1