(Hotels, restaurants and tea stalls closed) परभणी जिल्ह्यात उद्यापासून हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल बंद
परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कठोर निर्णय घेत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटसह चहास्टॉल व पानपट्टी उद्या सोमवारपासून (दि,22 ते 31) मार्चपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. (Hotels, restaurants and tea stalls closed in Parbhani district from tomorrow)
दरम्यान, चहास्टॉल, रेस्टॉरंट, हॉटेल व किचनला योग्य ती सर्व खबरदारी घेऊन खाद्यपदार्थ बनवने व फक्त पार्सल स्वरूपातच विक्री व वितरित करण्यास परवानगी दिली आहे. (Hotels, restaurants and tea stalls closed in Parbhani district from tomorrow)
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यात चहा स्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, किचन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तसेच या ठिकाणी होणार्या गर्दीच्या अनुषंगाने सूचना देऊनही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचेही आदेशात म्हटले आहे. (Hotels, restaurants and tea stalls closed in Parbhani district from tomorrow)
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक असून, चहास्टॉल, पानपट्टी, रेस्टॉरंट, हॉटेल, लॉन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी दिले आहेत. या आदेशा अंमलबजावणी करण्याची दबाबदारी ही जिल्हा पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व नगर पालिका व नगर पंचायत मुख्याधिकारी, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्यावर राहील, असे आदेशात नमूद केले आहे. (Hotels, restaurants and tea stalls closed in Parbhani district from tomorrow)