(Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed) हॉटेल्स, बार, रेस्टॉरेंन्ट, परमिट रुम, ढाबे बंद
नांदेड : शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणुची लागन झालेल्या रुग्णांची होत असलेली वाढ ही चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कठोर निर्णय घेत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed)
आता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी जारी केलेल्या आदेशात हॉटेल्स, बार, रेस्टॉरेंन्ट, परमिट रुम, ढाबे, मिठाईचे दुकाने 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत.मात्र, होम डिलिव्हरी, चिकनचे दुकान सुरु रहणार आहेत. तर जिल्ह्यातील सर्व जीम व व्यायमशाळा 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेत. (Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed)
कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सतत हात धुणे आणि शारिरीक अंतर राखणे आवश्यक आहे. आपण याची काटेकोर अंमलबजावणी केली तर प्रशासनावर कठोर निर्णय घेण्याची वेळ येणार नाही. कृपया नागरीकांनी वरील ञिसूञीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नांदेड जिल्हा कोरोनामुक्त करण्यात सहभाग नोंदवावा ही विनंती. हा निर्णय सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी कृपया ही पोस्ट शेअर करावी. (Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed)
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोवीड-19 अर्थात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाईलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 31 मार्च 2021 पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टारंट, खाद्यगृह, परमिटरूम, बेकरी, स्वीटमार्ट, चाटभांडार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. माञ या निर्णयामुळे वरील आस्थापनांवर उपजिवीका अवलंबून असलेल्यांना अर्थिक अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन तसेच नागरीकांच्या सोयीसाठी वरील आस्थापनांना पार्सल सेवा राञी 10.00 वाजेपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व जीम, व्यायामशाळा, सार्वजनिक उद्याने दि. 31 मार्च 2021 पर्यंत राहतील. (Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed)
आपण सर्वांनी एकञ येऊन या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली, आणि कोवीड-19 रूग्णांची संख्या कमी होऊ लागली तर परीस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयांमध्ये दि. 31 मार्च 2021 पूर्वी शिथीलता देण्यात येईल याची नोंद घ्यावी. (Hotels, bars, restaurants, permit rooms, dhaba closed)
– डॉ. विपीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड.