अभ्यास व परीक्षेविषयी विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

पुणे Pune news : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune) पुणे विभागीय मंडळ पुणे यांच्या वतीने  येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी)  (Higher Secondary Certificate Examination) 16 सप्टेंबर 2021 पासून व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) 22 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहे. (Helpline for students about studies and exams started)

परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे( Pune) , अहमदनगर (Ahmednagar), सोलापूर  (Solapur )जिल्हयातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव अनुराधा ओक  (Anuradha Oak, Divisional Secretary, Pune Divisional Board) यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
विद्यार्थ्यांना/पालकांना काही समस्या असल्यास दुरध्वनी/भ्रमणध्वनी वर सकाळी 10ते संध्याकाळी 6  वाजेपर्यंत संपर्क साधावे, हेल्पलाईनवर परीक्षेच्या काळात समुपदेशनासाठी सकाळी 8.00 ते सायंकाळी 8.00 या वेळेत संपर्क साधावे. इयत्ता 12 वीसाठी 7588048650, इयत्ता 10 वी 9423042627 भ्रमणध्वनी क्रमांक असे आहेत. समुपदेशनाची सेवा, समुपदेशकाच भ्रमणध्वनी क्रमांक परीक्षा कालावधीपुरते मर्यादित राहतील.  (Helpline for students about studies and exams started)

पुणे जिल्ह्यासाठी संदीप शिंदे, बालकल्याण शिक्षण संस्था बारामती,  भ्रमणध्वनी क्रमांक 9822686815, अहमदनगर जिल्ह्यासाठी एस.एल. कानडे, ज्ञान सरिता विद्यालय, वडगाव गुप्ता ता. जि. अहमदनगर, भ्रमणध्वनी क्रमांक 9028027353, सोलापूर जिल्ह्यासाठी पी.एस. तोरणे, सदाशिव माने विद्यालय, अकलुज, तालुका माळशिरस जि.सोलापूर, भ्रमणध्वनी क्रमांक 9960002957 या समुदेशकाची जिल्हानिहाय नेमणूक करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव ओक यांनी दिली.  (Helpline for students about studies and exams started)

Local ad 1