नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ; 28 महसूल मंडळात नदी-नाले ओव्हर फ्लो

नांदेड Heavy Rains : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओव्हर फ्लो झाले आहेत. (Heavy Rains in Nanded district) परिणामी हजारो हेक्टर क्षेत्रांवरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, जिल्ह्यातील 28 महसूल मंडळात ढगदफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. (Cloud-like rainfall in 28 revenue boards in the district) 

जिल्ह्यात सर्वच भागात जोरजार पाऊस सुरु असून, जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्प, धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील विष्णपुरी प्रकल्प (Vishnupuri dam), मानार उर्ध्व प्रकल्प (Manar dam overflo) पूर्ण भरले असून, गोदावरी (Godavari river), मन्याड नदी (Manyad river), लेंडी व इतर नद्यांना पूर आला आहे.  पावसाचा जोर अधिक असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Heavy Rains in Nanded district)

 

 

नांदेड जिल्हात सर्वत्र अतिवृष्टी होत असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वीज पुरवठा खंडीत झाला असून, आश्या परिस्थितीत नागरिकांनी स्वतः व परिवाराची सुरक्षित घरीच राहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस ही रिस्थितीती राहू शकतो. गेली 2 दिवस झाले एकसारखा धो धो पाऊस पडतच आहे.काही गावातील घरच्या आजूबाजूने नाल्यासारखे पाणी वाहत आहे.

 

शेतकर्‍यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना द्यावी

जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे  विमाधारक शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 103 5490 तसेच पिक विमा ॲपच्या माध्यमातून व ईमेल supportagri@iffcotokio.co.in द्वारे किंवा कृषि व महसूल विभागात प्रत्यक्ष अर्ज देऊन 72 तासात नुकसानीची पूर्व सूचना शेतकऱ्यांनी देणे आवश्यक आहे. तरी सर्व शेतकर्‍यांनी नुकसानीची माहिती कंपन्यांना द्यावी.

 

गावातील नाल्यासारखे जे पाणी वाहत आहे, त्या पाण्याने आता गल्लीत उग्ररूप धारण केले आहे. विशेषतः शेतकरी व नदिलगतच्या गावकर्‍यांना स्वतः बरोबर आपल्या गुरा-जनावराची सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे. दोन ते तिन दिवस हे महत्त्वाचे आहेत. सर्वांनी काळी घ्यावी.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर. नांदेड.

 

Local ad 1