Heavy rain in Pune flooded the city । पुण्यात मुसळधार पाऊस, जागो-जागी पाणी साचले

Heavy rain in Pune flooded the city ।  पुणे : पुणे शहरात शनिवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची (Heavy rain in Pune flooded the city) शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. शिवाजीनगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे (Shivajinagar, JM Road, Hadapsar, Sinhagad Road, Warje) या सर्व भागात जोरदार पाऊस झाला आहे. (Heavy rain in Pune flooded the city)

 

 

सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे आपटे रोड परिसरतील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वाहन चालकांची पाण्यातून मार्ग काढताना कसरत होत आहे. पुणे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सिंहगड रस्त्यावर विविध ठिकाणी पाणी साचले असून, वडगाव पुलाखाली तळ्याचे स्वरूप आले आहे. पुण्यातील येरवडा परिसरात घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे रहिवाश्यांचे हाल होत आहेत. घरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. घरात पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले आहे.

 

Heavy rain in Pune flooded the city, Shivajinagar, JM Road, Hadapsar, Sinhagad Road, Warje,

 

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैऋत्य मान्सून आता दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

 

Heavy rain in Pune flooded the city, Shivajinagar, JM Road, Hadapsar, Sinhagad Road, Warje,

शहरात सुरु असलेला मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास २५ ठिकाणी झाड पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. झाड पडण्याच्या घटना वाढत आहे. अग्निशमन वाहने व जवान विविध वर्द्यांवर कर्तव्य बजावत असून कुठे कोणी जखमी किंवा जिवितहानी नाही.

Local ad 1