नांदेड जिल्ह्यातील 32 महसूल मंडळात तुफान पाऊस

नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू असून, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सात तालुक्यातील 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तर आसना नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. (Heavy rain in Nanded party 32 boards)

 

 

 

नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री चालू झालेल्या मुसळधार पावसामुळं अक्षरशः हाहाकार  घातला आहे. सायंकाळी सुरु झालेल्या या ढगफुटीसदृश्य पावसामुळे हजारो हेक्टरावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान रात्रीपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. तर शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.अर्धापूर तालुक्यातील गणपूर, सेलगाव, कोंढा, पिंपळगाव, मुदखेड या गावांमध्ये पाणी शिरले असून, गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. (Heavy rain in Nanded party 32 boards)

 

 

 

नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यासह तब्बल ३२ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात नांदेड, अर्धापूर, मुदखेडसह अन्य तालुक्यातील शेतीपिके व रस्त्यांचे अधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (Heavy rain in Nanded party 32 boards)

Local ad 1