हजार रुपयांची लाच स्वीकारणारा मुख्याध्यापक अटक

औरंगाबाद : इयत्या बारावी उत्तीर्ण झालेल्या निकाल प्रमाणपत्र आणि बोर्डाच्या प्रमाणपत्रावर आईचे नाव चुकीचे पडले होते. ते दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्याकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. परंतु विद्यार्थ्याच्या पालकांना ती मान्य नव्हती. त्यांनी लाचलुचपत प्रथिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ही लाच स्विकारताना मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. (Headmaster arrested for accepting bribe of Rs) 

 

 

*==* *प्रेसनोट* *==*
*यशस्वी सापळा*
▶️ *युनिट -* जळगाव.
▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-४६
रा.तरवाडे ता.चाळीसगाव जि.जळगाव.
▶️ *आलोसे-*
राजेंद्र भास्करराव पाटील, वय-55, व्यवसाय-नोकरी, मुख्याध्यापक कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव
ता.सोयगाव जि.औरंगाबाद. वर्ग-२
रा.भगवती हौसिंग सोसायटी,मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव.
▶️ *लाचेची मागणी-* 1,000/-रू.
▶️ *लाच स्विकारली-* 1,000/-रु.
▶️ *हस्तगत रक्कम-* 1,000/-रू.
▶️ *लाचेची मागणी -* दि.17/05/2022
▶️ *लाच स्विकारली-* दि.17/05/2022
▶️ *लाचेचे कारण -*.
तक्रारदार यांचा मुलगा हा कविवर्य श्री.ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,वडगाव ता.सोयगाव जि.औरंगाबाद येथुन सन-२०२१ मध्ये इयत्ता-१२ वी या वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेला होता सदर निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टीफिकेट वरती मुलाच्या आईचे नाव चुकीचे असल्याने सदर दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष 1,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम आलोसे यांनी स्वतः वर नमुद राहत असलेल्या स्वतःच्या घरी स्वीकारली म्हणून गुन्हा.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ *तपास अधिकारी-*
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, जळगाव.
▶️ *सापळा व मदत पथक-*
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.
▶️ *मार्गदर्शक-*
*1)* मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
*3)* मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी-*
मा.शिक्षणाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक कार्यालय, जिल्हा परिषद औरंगाबाद
—————————–
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
==================

Local ad 1