पुणे : ड्रग्ज प्रकरणानंतर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय आणि येथील प्रशासन चर्चेत आले. ससूनमध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील (Drug mafia Lalit Patil) पलायन केल्यामुळे ससूनचे अधिष्टाता आणि इतर डाॅक्टर दोषी असून, त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात होती. (Head of orthopedics team in Sassoon Dr. Devakate suspended)
ससूनमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीने अहवाल शासनास सादर केला आहे. शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.
चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे दिसून आले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात निर्णय घेतला आहे.
ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज संबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर (Director of Medical Education Department Dr. Dilip Mhaisekar)यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.