...

गुलटेकडी मार्केट यार्डात हापूस आंबा दाखल ; एका आंब्यांच्या किंमत वाचून बसेल धक्का !

पुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्डात  रविवारी देवगड मधील केशर हापूसची (Saffron, Hapus, Mango) पहिली पेटी दाखल झाली असून, त्यास तब्बल ३१ हजार रुपये इतका भाव मिळाला आहे. मार्केटयार्डातील व्यापारी अनिरुध्द उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर ही पेटी दाखल झाली.  देवगड येथील शेतकरी साद मुल्ला यांच्या बागेतून ही आवक आली आहे. सव्वा पाच डझनाची ही पेटी व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी 31 हजार रुपयांना म्हणजेच सुमारे 470 रुपयांना एक आंबा या प्रमाणे खरेदी केली आहे. (Hapus mangoes arrive in Gultekdi market yard)

 

सावधान..! म्हडाचे घर देण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

यावेळी भाजपाचे नेते बाबा मिसाळ, फळे व भाजीपाला विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे, गौरव घुले, अंकुश वाडकर, युवराज काची, राजु पतंगे, राजु भोले, अरुण वीर, रोहन जाधव, किशोर लडकत, संजय वखारे, प्रकाश पंजाबी, शरद कुंजीर, बलभिम माजलगावे आदी उपस्थित होते.

 

भ्रमंती LIVE स्टोरी – आत्मिक वैभव

यंदा पाऊस जास्त झाल्याने आंब्याची आवक सुरळीत सुरु होण्यास काहीसा उशीर होईल़ येत्या १५ मार्चपासून आवक नियमित सुरु होईल, असा अंदाज आहे. आंब्यांचा दर्जा चांगला राहील मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन १० ते २० टक्क्यांनी कमी राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Local ad 1