मुंबई : मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Ramadan Eid from Chief Minister, Deputy Chief Minister Ajit Pawar)
“ईद-उल-फित्र तथा रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित बांधवांना मदत करुन त्यांच्या जीवनात आनंद आणूया. यंदाची ईद एकोप्यानं, आनंदानं, उत्साहानं साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधूत्वाचा संदेश जगाला देऊया…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Happy Ramadan Eid from Chief Minister, Deputy Chief Minister Ajit Pawar)
रमजान ईदनिमित्तानं दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण महाराष्ट्रात उत्साहानं साजरा होतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरीनं सर्वधर्मीय बांधव ईदच्या आनंदात सहभागी होतात. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी रमजान ईद समाजात आनंद, उत्साहाचं वातावरण घेऊन येईल.
देशवासियांमध्ये एकजूटीची, सहकार्याची, बंधूत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. (Happy Ramadan Eid from Chief Minister, Deputy Chief Minister Ajit Pawa
देशवासियांमध्ये एकजूटीची, सहकार्याची, बंधूत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. (Happy Ramadan Eid from Chief Minister, Deputy Chief Minister Ajit Pawar
)