...

गरजू, सर्वसामान्यांचे ‘सारथी’ – रोहन सुरवसे पाटील

पुण्यात रोहन सुरवसे पाटील हे नाव समोर आले की, त्यांनी केलेली रुग्ण सेवा आणि शासकीय कार्यालयांमध्ये सुरु असलेले भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणारा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. सरकारी काम सहा महिने थांब…ही म्हण प्रचलित आहे. मात्र, सर्वसामान्यांचे काम वेळेत नियमानुसार झाले पाहिजे. खासगी रुग्णालयातील खर्च न परवडणारा मात्र, त्याच  रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णालयावर उपचार झाले पाहिजे, अशी भूमिका घेऊन सारथी फाऊंडेशनच्या माध्यमातून १४ वर्षांपासून अविरत समाजकार्य करत आहे. त्याच त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ध्योय धोरणे सर्वसान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवक काँग्रेसमध्ये एक सच्चा कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कामांची दखल घेऊन त्यांना युवक काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या पदाला साजेशा काम सुरु केले आहे. त्यांना पुणे शहर आणि राज्याच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांकड सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.   त्यांचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्ता ने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा..!  (Happy birthday to Rohan Suravse Patil)

रोहन सुरवसे-पाटील हे नाव पुणे शहरातील असंख्य लोकांना परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. गेल्या १४ वर्षांपासून अविरत विविध आंदोलने करून त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि गरजू व पिडीत व्यक्तीला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचे मोठे काम करत आहेत.  समाजातील कोणत्याही गरजू, पीडित, शोषित लोकांसाठी धाऊन जाणारे कार्यकर्ते अशी रोहन सुरवसे पाटील यांची ओळख आहे.

 

माळशिरस तालुक्यातील कोंडबावी या गावातून कामानिमित्त ते पुण्यात आले. लहानपणापासून सामाजिक करण्याची आवड असल्याने त्यांचे मन कामात रमले नाही त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या सुरुवात केली. तो सामाजिक काम करून न थांबता त्यातून ते एक पाऊल पुढे जात काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या ध्येयधोरणाशी प्रमाणित राहत पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहेत. विशेष म्हणजे त्यांना पार्श्वभूमी नसताना देखील त्यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर काँग्रेस पक्षाचा युवा काँग्रेस या बिग मध्ये प्रदेश स्तरावर काम करत आहेत.

 

 

 रोहन पाटील शेतकरी कुटुंबातील. लहानपणापासून समाजकार्याची आवड म्हणून त्यांनी २०१० सालापासून सामाजिक कार्याला सुरूवात केली. सर्वसमान्यांच्या प्रश्नांना पाठबळ देण्याचे काम आजही ते करत आहेत. २४ तास उपलब्ध अशीच त्यांची महती. २०१४ साली त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्यातरी पक्षाचे पाठबळ असणे गरजेचे, या हेतूने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०२१ साली युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून राज्यभरातून त्यांना भरघोस मतं मिळाली. त्यांनी यादरम्यान केलेले एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन, तलाठी भरती घोटाळा प्रकरणातील आंदोलन हे राज्यभर गाजले. याच दरम्यान २०२२-२३ मध्ये शहरात अनेक सर्वसामान्यांची बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीत देखील त्यांनी प्रामुख्याने लक्ष घालत तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे युवक काँग्रेसच्या वतीने सतत पाठपुरावा केल्याने फसवणूक झालेल्या जनतेला न्याय मिळवून दिला. त्यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील काही अधिकारी, दुय्यम निबंधक, वरिष्ठ लिपीक हे याप्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले. जवळपास ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, विभागीय चौकशी त्यांच्यामुळे झाली.

 

 

शहरातील पब संस्कृती विरोधात देखील त्यांनी तत्कालीन आमदारांसह आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासाठी सक्रिय काम केले. माजी आमदार आणि राजकीय गुरू मोहन जोशी यांच्यासोबत शहरातील वाहतुक समस्येसंदर्भात ‘वेकअप पुणेकर’ ही संकल्पना रोहन सुरवसे पाटील यांनी राबवली. त्यांचे वडील उमेश सुरवसे पाटील, आई आशा सुरवसे पाटील, बायको शिवानी सुरवसे पाटील आणि भाऊ अनिल यांच्या सदैव पाठबळामुळेच आज इथपर्यंत पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासोबतच जवळचे सहकारी आणि मित्र यांनी देखील वेळोवेळी आधार दिल्याचे देखील ते म्हणाले.
कोरोना काळात १० हजार किरणा कीटचे वाटप, ५० हजार स`निटायझर आणि मास्क शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांनी दिले. यासोबतच रुग्णसेवेसाठी देखील नेहमी कटीबद्ध असलेल्या रोहन सुरवसे पाटील यांनी १६ हजार रुग्णांसाठी त्यांच्या ‘सारथी फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम केले. यातील अनेकांसाठी मोफत उपचार, गुडघ्यांचे ऑपरेशन, मणक्यांचे आजार यासह बायपास शस्त्रक्रिया त्यांनी करून घेतल्या. आजही शहरातील अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या फाऊंडेशनद्वारे केला जातो असे सांगत, यामुळे मला सुखाने झोप येते असे ते सांगतात.
नुकत्याच झालेल्या बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. शहरातील बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा करून ते सुरू केले. आजही दिवसाला साधारण १०० फोन त्यांना शहरातील सर्वसामान्यांकडून येतात, प्रत्येक फोनला तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देत रोहन सुरवसे पाटील त्यांची अडचण तात्काळ दूर व्हावी यासाठी
प्रयत्नशील असतात. हेच काम यापुढे देखील आणखी उत्साहाने करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. घरच्यांना वेळ देऊ शकत नसलो तरी त्यांचे पाठबळ नक्कीच सदैव माझ्यामागे असल्याचे भाव देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Local ad 1