पुणे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. तिसऱ्या आघाडीतील प्रहार संघटनेचे हाजी जुबेर मेमन यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत हडपसर विधानसभा मतदारसंघातून (Hadapsar Assembly Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. (Haji Zubair Memon in the election fray from Hadapsar)
Assembly Election Voting । 12 पैकी कोणताही एक पुरावा असेल तरच करता येईल
Related Posts
पुण्यातून मागच्या तीस वर्षात पहिला मुस्लीम समाजाचा आमदार विधानसभेत जाणार, असा विश्वास यावेळी जुबेर मेमन यांनी व्यक्त केला आहे. कोंढवा येथून भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी ॲड जमीर कागदी (माजी नगरसेवक), इक्बाल शेख, मौलाना मुफ्ती अब्दुल्ला,मौलाना कारी जमील,सत्यवान गायकवाड,लुकास केदारी (आरसीएस),मल्लिका शेख, हाजी फरीद खान, पत्रकार अल्ताफ पीरजादे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे या रॅलीत सहभागी झाले होते. (Haji Zubair Memon in the election fray from Hadapsar)