...

जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारीच्या फाईल असलेल्या कक्षाला आग, जिल्हा प्रशासनाचे आले स्पष्टीकरण

नांदेड : ग्रामीण भाग असो की, शहरांच्या लगतच्या भागात बेकायदा गुंठेवारी (Illegal Gunthewari) पद्धतीने जमिन विकण्यात आली आली आहे. त्यामुळे अनियंत्रित शहरे वाढत असून, आता शासनाने अटी व शर्थिंची पूर्तता करणारी गुंठेवारी कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील गुंठेवारीच्या फाईल असलेल्या कक्षाला आग लागली आहे.  त्यातच आता जिल्हा प्रशासनाने सर्व फाईल सुरक्षित असल्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. (Gunthewari’s file room in Collector’s office on fire)

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनमध्ये असलेल्या ग्रामीण गुंठेवारी कक्षास 15 डिसेंबर 2022 रोजी रात्री 12.10 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. मनपाच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. (Gunthewari’s file room in Collector’s office on fire)

 

या आगीच्या घटनेत गुंठेवारी विभागात असलेल्या गुंठेवारीच्या फाईल्स तसेच निवडणुकीचे जुने नमुने असलेले रेकॉर्ड हे 5 ते 10 टक्के अंशत: जळाले आहेत. गुंठेवारीच्या प्रकरणांमध्ये नगररचना कार्यालयाचा अभिप्राय घेण्यात येतो. नगररचना विभागाचे हे अभिप्राय व प्रमाणित नकाशाच्या मुळ प्रती नगररचना कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे अंशत: जळालेल्या गुंठेवारीच्या संचिकेची पुर्नरबांधणी होऊ शकते. त्यामुळे जनतेने घाबरु नये असे, आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी कक्षाचे प्राधिकृत अधिकारी यांनी केले आहे. (Gunthewari’s file room in Collector’s office on fire)
Local ad 1