गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम म्हणजे काय? – What is Guivel Balance Syndrome?
- हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाख लोकांपैकी एका व्यक्तीत आढळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लस घेतल्यानंतर किंवा एच1एन1 लस घेतल्यानंतर काही प्रकरणांमध्ये हा आजार होऊ शकतो. याचे निदान करण्यासाठी स्पायनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपचारासाठी प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या पद्धतींचा वापर केला जातो. हा आजार दुर्मिळ असला तरी घाबरण्यासारखा नाही, असे तज्ज्ञ सांगतात.
एनआयव्हीकडून रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या टीम दाखल होणार आहेत. तसेच, ज्या हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, त्या परिसरातील इतर रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. महापालिकेने या रुग्णांची सखोल तपासणी सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. या दुर्मिळ आजारावर उपचार उपलब्ध असून, तो संसर्गजन्य नाही, हे विशेष आहे.गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार कित्तेक वर्षांपासून आहे. हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे घाबरुन न जाता वेळेत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे. हे आजार असलेले 50 ते 60 टक्के रुग्ण हे एक ते दीड महिन्यांत बरे होता. तर उर्वरित 30 ते 40 टक्के रुग्णांना अधिक काळ उपचार घ्यावा लागतो.
– डॉ. अविनाश भोंडवे, माजी आध्यक्ष आयएमए, पुणे.