...

Koregaon Bhima। कोरेगांव भीमा येथील अभिवादन कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सूचना जारी

MH टाईम्स वृत्तसेवा  : मागील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणु प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये / रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, जेथे जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे असे कार्यक्रम टाळणे अपरिहार्य झालेले आहे. (Guidance instructions for the greeting program at Koregaon Bhima)

 

 

 

कोरोना संक्रमण रोगाचा प्रभाव पाहता, यावर्षी सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक १ जानेवारी, २०२२ रोजी पेरणे, ता. हवेली, जि. पुणे येथील जयस्तम अभिवादनाच्या कार्यक्रमाबाबत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. (Guidance instructions for the greeting program at Koregaon Bhima)

 

 

1) दिनांक १ जानेवारी, २०२२ रोजी मौजे पेरणे, ता.हवेली, जि. पुणे येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम कोविड-१९/ ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता आयोजित करावयाचा आहे.

 

 

२) कोविड-१९ च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्रमांक- डीएमयु/ २०२०/प्र.क्र.९२/डीआयएसएम-१, दि. २७.११.२०२१ तसेच परिपत्रक क्रमांक-डीएमयु/ २०२०/प्र.क्र. २२ / डीआयएसएम-१, दि. २४.१२.२०२५ अन्वये दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, (Guidance instructions for the greeting program at Koregaon Bhima)

 

 

३) अभिवादन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र व परराज्यातून अनुयायी जयस्तम पैरणे येथे येण्याची शक्यता असल्याने कोविड-१९ चा धोका लक्षात घेऊन होणाऱ्या गर्दीवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने पेरणे परिसरात स्थानिक प्रशासनामार्फत निर्बंध घालण्यात यावेत.

 

 

(४) जयस्तंभास अभिवादनाच्या कार्यक्रमाबाबत सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून बेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने शक्यतो सर्व अनुयायांनी जयस्तंभ, पेरणे येथे न येता घरी राहूनच जयस्तंभास अभिवादन करावे. शासन परिपत्रक क्रमांका संकिर्ण- १२२१/प्र.क्र.२४८/विशा-१५

 

 

५) स्थानिक प्रशासनाच्या निबंधांना अधीन राहून जयस्तंभ याठिकाणी मर्यादित संख्येत येणाऱ्या भाविकांनी मास्कचा बापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग / संक्रमण वाढणार नाही. ६० वर्षावरील वृध्द व्यक्ती व १० वर्षाखालील लहान मुले यांना कोविड-१९/ या पार्श्वभूमीवर जयस्तंभ येथे अभिवादनासाठी आणणे कटाक्षाने टाळावे,

 

 

६) जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ व पुस्तकें यांचे स्टॉल लावण्यात येवू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत.

 

७) कोविड- १९ व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणु प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी चिहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन सर्व नागरिकांनी करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयस्तम अभिवादन सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासन व स्थानिक प्रशासन स्तरावरून आणखी काही सूचना नव्याने प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. (Guidance instructions for the greeting program at Koregaon Bhima)

Local ad 1