...

Corona Updates | राज्याला धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची वाढ ; राज्यात आज किती हजार रुग्ण आढळले वाचा..

Corona Updates | मुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा नवा विक्रम नव्या वर्षात नोंदवला असून, तब्बल  36 हजार 265 नवे कोरोना रुग्ण  गुरुवारी आढळून आले आहेत. यातील 20 हजार रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले. त्यामुळे मुंबईतील अनेक भाग कोरोना हाॅटस्पाॅट (Corona Hotspot) होण्याची भिती निर्माण झाली आहे. (The growth of corona patients that shocked the state)

 

 

 

एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली तरी, दुसरीकडे नव्याने अढळत असलेल्या बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, लक्षणे नसलेल्या नागरिकांकडून कोरोनाचा प्रसार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (The growth of corona patients that shocked the state)

 

 

 

राज्यात गुरुवारी कोरोनाचे 36 हजार 265 नवे रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात एकूण 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या रुग्णवाढीतील सर्वाधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत नोंदवली गेली असून मुंबईत तब्बल 19 हजार 780 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर दुसरीकडे 8 हजार 907 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. (The growth of corona patients that shocked the state)

 

 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली.

 

 

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

 मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या भयंकर वेगाने वाढते आहे. मात्र अद्याप येथील लोकल बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. सध्या तरी जिल्हाअंतर्गत बंद घालण्याची गरज वाटत नाही.  येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन विकेंड लॉकडाऊनविषयी विषयी निर्णय घेतला जाईल, असे माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

 

Web title : The growth of corona patients that shocked the state

Local ad 1