Nanded-Bidar new railway line । नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्गाला हिरवा कंदील

नांदेड : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला नांदेड-बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, हा पुढील काही वर्षात पूर्ण होईल, असा विश्र्वास नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Nanded MP Pratap Patil Chikhlikar) यांनी व्यक्त केला आहे. (Green signal on Nanded-Bidar new railway line)

 

“आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट या जगात नाही” : युनुस सय्यद

 

नांदेड -बिदर रेल्वेसाठी (Nanded-Bidar Railway) अनेक वर्षांपासून लढा आणि प्रयत्न सुरू होते. मात्र, राज्यात आणि केंद्रात अनेकवेळा सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) मार्गावर रेल्वेलाईन आणण्यासाठी यश मिळाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल (Prime Minister Narendra Modi and the then Railway Minister Piyush Goyal) यांच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष काम आणि अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी पाठपुरावा केला. संसदेच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केले होते. शीख बांधवांसाठी आणि अन्य दळणवळणाच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच मुदखेड – परभणी (Mudkhed-Parbhani) विद्युतीकरण व दुहेरीकरणालाही मंजुरी देण्यात आल्याचे खासदार चिखलीकर (MP Chikhlikar) यांनी सांगितले. (Green signal on Nanded-Bidar new railway line)

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 कामगार ठार

अर्थसंकल्पात झालेली आर्थिक दरतूद

रेल्वे अर्थसंकल्पाच्या (Railway budget) पिंक बुकमध्ये बिदर -नांदेड या १५५ किलोमीटर अंतराच्या (Bidar-Nanded distance of 155 km) नवीन रेल्वे लाईनला मंजुरी (Approval of new railway line) देण्यात आली, असून यासाठी सुमारे दोन हजार २५२ कोटी रुपये (Two thousand 252 crores) तरतूद करण्यात आली. मुदखेड – परभणी (८१.४३ किलोमीटर) (Mudkhed – Parbhani) दरम्यानच्या दुहेरी लाईनसाठी ३० कोटी २० लाख रुपये अर्थसंकल्पात मंजूर (Approved in the budget) करण्यात आले.

 

 

नांदेड मंडळ अंतर्गत चौकीदार नसलेल्या फाटकांवर चौकीदार नियुक्तीसाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले. या शिवाय नादेड डिव्हीजनतंर्गत सब – वे चे रेल्वे क्रॉसिंग, भोकर – हदगाव, परभणी – पिंगळी रोड, गंगाखेड – पोखर्णी, चोंडी-वसमत, हिंगोली – धामनी रोड (Bhokar – Hadgaon, Parbhani – Pingali Road, Gangakhed – Pokharni, Chondi-Wasmat, Hingoli – Dhamni Road) दरम्यान उंच रस्ते पूल बांधण्यास मान्यता देण्यात आली. मनमाड – परभणी – नांदेड – सिकंदराबाद – गुढगल – घोड – गुंटकल (Manmad – Parbhani – Nanded – Secunderabad – Gudhgal – Ghod – Guntkal) या दरम्यान सिग्नल आणि दूरसंचार संबंधिताच्या कार्यालयातही अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

 

 

आठ पुलांचे होणार पुनर्निर्माण

मुदखेड – आदिलाबाद – पिपळखुटी, विकाराबाद परथ या दरम्यान लातूर – तिरुपती, नांदेड – पंढरपूर रेल्वेचा (Latur – Tirupati, Nanded – Pandharpur Railway) प्रस्ताव मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (General Manager of Central Railway) यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. रिनिव्हललाही मान्यता देण्यात आली. तसेच मनमाड – मुदखेड (Manmad – Mudkhed) दरम्यान आठ पुलांचे पुनर्निर्माण केले जाणार आहे. (Green signal on Nanded-Bidar new railway line)

Local ad 1