दोन वर्षांच्या अंतराने भारतीय नागरीकांना हज यात्रेसाठी ‘ग्रीन सिग्नल’
कोविडशी संबंधित नियमांमुळे यावेळी भारतीय हज यात्रेकरूंसाठी 79 हजार 237 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. (‘Green signal’ for Hajj pilgrimage to Indian nationals after two years)
मिळालेल्या माहितीनुसार, 79 हजार 237 हज यात्रेकरूंपैकी 56 हजार 601 लोक हज कमिटी ऑफ इंडिया आणि 22 हजार 636 लोक हज ग्रुप आयोजकांमार्फत जाणार आहेत. मात्र, हज यात्रा करण्याची इच्छा असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येला मर्यादा आल्या आहेत. सौदी सरकारने ६५ वर्षांवरील हज यात्रेकरूंवर बंदी घातली आहे. (‘Green signal’ for Hajj pilgrimage to Indian nationals after two years)
कोरोना महामारीच्या काळात, सौदी सरकारने मर्यादित संख्येनेच स्थानिक लोकांना हजला परवानगी दिली होती. इतर कोणत्याही देशातील नागरिक हज यात्रेला गेले नाहीत. त्यामुळे भारतीय हज यात्रेकरूंनाही जाता आले नव्हते. देशातील ज्येष्ठांनी भरलेले सर्व अर्ज फेटाळले जाणार आहेत. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Minority Minister Mukhtar Abbas Naqvi) यांनी सांगितले की, हज 2022 ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. (‘Green signal’ for Hajj pilgrimage to Indian nationals after two years)
RT-PCR आणि लस घेतलेली असणं आवश्यक
नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार, यावेळी हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना 72 तास अगोदर आरटी-पीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आरटी-पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यासच तो हज यात्रेला जाऊ शकेल. लसीचे दोन्ही डोस घेणे देखील आवश्यक आहे. (‘Green signal’ for Hajj pilgrimage to Indian nationals after two years)