Grant scheme । मागासवर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसायासाठी अनुदान योजना ; अर्ज करण्यासाठी उरले अवघे सात दिवस
Grant scheme । नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील मागासवर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसायासाठी (Grant scheme for dairy business) गाई/म्हैस खरेदीसाठी अनुदान योजना (सन २०२१-२२) राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र लाभार्त्यांना अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्यासाठी अवघे सात दिवस शिल्लक आहेत. अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. (Nanded Zilla Parishad Social Welfare Department)
जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत मागासवर्गीय व्यक्तींना दुग्ध व्यवसायासाठी गाई/म्हैस खरेदीसाठी अनुदान योजना (सन २०२१-२२) राबविण्यात येत आहे. त्यात पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज पंचायत समितीमार्फत सादर करायचे असून, गटविकास अधिकारी यांनी प्राप्त होणाऱ्या अर्जांची छाननी करून योजनेच्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने परिपूर्ण व पात्र अर्ज व त्याची गादी दि. १५/१०/२०२१ पर्यंत जिल्हा परिषदेकडे सादर करावे, अशा सूचना जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी केले आहेत. (Nanded Zilla Parishad Social Welfare Department)
*Record rainfall। नांदेड जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस ; किती झाला जाणून घ्या..!*
Record rainfall। नांदेड जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस ; किती झाला जाणून घ्या..!
योजनेच्या अटी व शर्ती
1) अर्जदार हा ग्रामीण भागातील मूळ रहिवाशी असावा.
2) अर्जदार हा अनु जाती/अनु. जमाती / वि.जा.भ.ज. प्रवर्गातील
3) ३ अर्जदाराचे वय १८ पेक्षा जास्त असावे. असावा. 4) जनावराची बाजारातील किंमत देय अनुदानापेक्षा जास्त असल्यास लाभार्थ्याचा तो स्वतःचा हिस्सा असेल.
5) अनुदानास पात्र लाभार्थी अंतिम निवडीचे अधिकार विषय समितीचे राहतील