acb trap case। शबरी घरकुलसाठी सात हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक अटक

acb trap case । आदिवासी समाजासाठी असलेल्या शबरी घरकुल योजना (Sabari Gharkul Scheme) अंतर्गत घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तसेच नमुना नंबर 8 अ चा उतारा (Grampanchayat Namuna 8) देण्यासाठी ग्रामसेवकांने (Gram sevak) सात हजार रुपयांची लाच मागितली. ते स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक (anti corruption bureau parbhani) पथकाने जिंतूर पंचायत समिती समोरील ज्युस सेंट्रमधून अटक केली. त्यामुळे पंचायत समितीमध्ये एकच खळबळ उडाली. (Gram sevak arrested while accepting bribe of 7 thousand rupees for Shabari Gharkul)

 

 

Nanded ACB Trap । आरटीई अर्जात गुगुलचे लोकेशन चुलके अन् गुरूजींनी मागितली 25 हजारांची लाच

ज्ञानेश्वर  उत्तम राठोड (Dnyaneshwar Uttam Rathod)  (वय  29 वर्षे ,पद – ग्रामसेवक वर्ग 3), ग्रामपंचायत केहाळ ,ता.जिंतूर , जि.परभणी सध्या रा.गडद गव्हाण ता.जिंतूर, जिल्हा परभणी असे लाच घेताना अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. (Gram sevak arrested while accepting bribe of 7 thousand rupees for Shabari Gharkul)

 

Ratnagiri ACB Trap । कामाचे बिल देण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना सरपंच-उपसरपंचाला अटक

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 28 वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर आदिवासी समाजासाठी असलेल्या शबरी घरकुल योजना अंतर्गत घरकुल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी २७ एप्रिल रोजी सात हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा केली. त्यात राठोडने लाच मागितल्याचे  एप्रिल रोजी पडताळणी मध्ये सिद्ध झाले. तर १५ मे रोजी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.  (Gram sevak arrested while accepting bribe of 7 thousand rupees for Shabari Gharkul)

 

ही कारवाई अँटी करप्शन ब्यूरो नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (Superintendent of Police of Anti Corruption Bureau Nanded area Dr.Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे (Deputy Superintendent of Police Kiran Bidve) , पोनि सदानंद वाघमारे,  पोह चंद्रशेखर निलपत्रेवार, पोह मिलिंद हनुमंते, पोशि अतुल कदम, पोशि शेख मुख्तार, पोशि शेख जिब्राईल, चालक पोह जनार्दन कदम यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उप अधीक्षक  किरण बिडवे करत आहेत.
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो,
 नांदेड परिक्षेत्र, नांदेड.  मोबाईल नंबर – 09623999944
किरण बिडवे, पोलिस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, परभणी
मोबाईल नंबर – 07020224631
अँटी करप्शन ब्यूरो, परभणी कार्यालय दुरध्वनी – 02452-220597
@ टोल फ्री क्र. 1064
Local ad 1