ग्रामपंचायतींना आता “या” कामासाठी मिळणार पुरस्कार

पुणे : राज्य शासनाने ग्राम स्वच्छता, गाव तंटामुक्तीसाठी गावांना पुरस्कार दिला जातो. आता बाल तस्करी, बाल कामगारमुक्त गावांना पुरस्कार दिली जाणार आहे. याची लवकरच घोषणा केली जाईल, अशी माहिती बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा (Sushiben Shah, chairman of the Commission for the Protection of Child Rights) यांनी पुण्यात दिली. (Gram Panchayats will now get awards for “this” work)

 

 

बाल हक्क संरक्षण आयोगाने पुणे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होत्या. यावेळी ॲड. निलिमा चव्हाण, ॲड. संजय सेंगर, ॲड. प्रज्ञा खोसरे, ॲड.जयश्री पालवे, सायली पालखेडकर, चैतन्य पुरंदरे आदी आयोगाचे सदस्य या वेळी उपस्थित होते. (Gram Panchayats will now get awards for “this” work)

 

 

बालकामगार आढळून आल्यानंतर त्यांना कामास प्रवृत्त करणारे मध्यस्थ आणि संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. करोनानंतर विनाअनुदानित शाळांमध्ये भरमसाठ शुल्कवाढ करण्यात आल्याच्या तक्रारीही आल्या असून शुल्क वाढवताना पालक-शिक्षक संघाला (पीटीए) विश्वासात घेऊन शुल्कवाढ केली किंवा कसे?, याबाबत आयोगाने माहिती मागविली आहे, अशी माहिती शहा यांनी दिली. (Gram Panchayats will now get awards for “this” work)

 

 

Local ad 1