...

Gram Panchayat Election 2022 । नांदेड जिल्ह्यात 160 ग्रामपंचायतीची रणधुमाळी रविवारी मतदान

Gram Panchayat Election 2022 । नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 (Gram Panchayat Election 2022) साठी रविवारी  (दिनांक 18 डिसेंबर)160 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. हे मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत या कालावधीत होईल. (Randhumali polling of 160 Gram Panchayats in Nanded district on Sunday)

 

मतदानाची मतमोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी होईल. या मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाईल. याबाबतची अधिसुचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुक्रवार 23 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 16 तालुक्यात 181 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 554 एवढी आहे. यात 1 हजार 391 ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी या निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा मुदत होती.  सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड तालुक्यामध्ये 7 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक असून यातील एकुण प्रभागाची संख्या 24 आहे तर सदस्य संख्या 61 आहे. (Randhumali polling of 160 Gram Panchayats in Nanded district on Sunday)
मतदान होत असलेल्या या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यात 2 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक असून प्रभागाची संख्या 6 आहे तर सदस्य संख्या 16 आहे. भोकर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीमध्ये 9 प्रभाग संख्या असून एकुण सदस्य संख्या 21 आहे. मुदखेड तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी प्रभागाची संख्या 3 असून  एकुण सदस्य संख्या 7 आहे. (Randhumali polling of 160 Gram Panchayats in Nanded district on Sunday)

 

Gram Panchayat Election 2022 हदगाव तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 18 असून एकुण सदस्य संख्या 48 आहे. हिमायतनगर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 आहे. किनवट तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 161 असून एकुण सदस्य संख्या 403 आहे. माहूर तालुक्यात 27 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 82 असून एकुण सदस्य संख्या 205 आहे. (Randhumali polling of 160 Gram Panchayats in Nanded district on Sunday)

 

धर्माबाद तालुक्यात 3 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 9 असून एकुण सदस्य संख्या 23 आहे. उमरी तालुक्यात एका ग्रामपंचायतीसाठी एकूण  प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 आहे. बिलोली तालुक्यात 9 ग्रामपंचायतीसाठी एकूण प्रभागाची संख्या 27 असून एकुण सदस्य संख्या 67 आहे. नायगाव तालुक्यात 8 ग्रामपंचायतीमध्ये  एकूण प्रभागाची संख्या 25 असून एकुण सदस्य संख्या 66 आहे.

 

मुखेड तालुक्यात 15 ग्रामपंचायतीमध्ये एकूण  प्रभागाची संख्या 45 असून एकुण सदस्य संख्या 111 आहे. कंधार तालुक्यात 16 ग्रामपंचायतीमध्ये एकूण प्रभागाची संख्या 48 असून एकुण सदस्य संख्या 122 आहे. लोहा तालुक्यात 28 ग्रामपंचायतीमध्ये एकूण  प्रभागाची संख्या 88 असून एकुण सदस्य संख्या 220 आहे. देगलूर तालुक्यात एका ग्रामपंचायतमध्ये प्रभागाची संख्या 3 असून एकुण सदस्य संख्या 7 एवढी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
Local ad 1