...

Governor bhagat singh koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज नांदेडमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांसोबतची बैठक रद्द

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये शितयुद्ध सुरु आहे. (Governor bhagat singh koshyari) राज्यपाल कोश्यारी तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यात तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले होते. परंतु त्याला महाविकास आघाडी सरकराने अक्षेप घेतला. त्यामुळे अखेर राज्यपालांवर बैठका रद्द करण्याची नामुष्यकी ओढावली आहे. (Governor Bhagat Singh Koshyari is on a visit to Nanded, Hingoli and Parbhani)

 

 

राज्यपाल कोश्यारी हे आज नांदेड येथे येणार आहेत. नांदेडमध्ये राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या मुले आणि मुलांच्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर राज्यपाल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार होते. शुक्रवारी ६ ऑगस्टला हिंगोली आणि शनिवारी ७ ऑगस्टला परभणीतही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक निश्चित करण्यात आली होती. राज्यपाल कोश्यारी यांच्या या तिन्ही आढावा बैठकावरून मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. (Governor Bhagat Singh Koshyari is on a visit to Nanded, Hingoli and Parbhani)

 

 

राज्यपाल कोश्यारी हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार स्वतःकडे घेण्याचा आणि राज्यात दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या संतप्त भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या होत्या. मंत्रिमंडळ सदस्यांच्या या संतप्त भावना पाहता राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे. तुम्ही मुख्यमंत्री नाहीत. राज्यपाल आहात. राज्यात दोन सत्ता केंद्रे निर्माण करू नका, असे राज्यपालांना अवगत करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. कुंटे यांनी लगेच राजभवनाच्या सचिवांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप कळवला होता. त्यानंतर या तिन्ही आढावा बैठका रद्द करून राज्यपालांचा सुधारित दौरा राजभवनाने जारी केला आहे. (Governor Bhagat Singh Koshyari is on a visit to Nanded, Hingoli and Parbhani)

 

राजभवनाने जारी केलेल्या सुधारित दौऱ्यानुसार नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आज दुपारी ३ वाजताची, उद्या दुपारी ४ वाजताची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि परवा सायंकाळी ६ वाजता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवलेली आढावा बैठक रद्द करण्यात आली आहे. या दौऱ्यात राज्यपाल कोश्यारी हे शासकीय विश्रामगृहांवर जिल्हा प्रशासनाशी फक्त चर्चा करणार आहेत. (Governor Bhagat Singh Koshyari is on a visit to Nanded, Hingoli and Parbhani)

Local ad 1