सरकारचा शेतकऱ्यांना मदतीचा हात : 177 कोटींचा निधी वितरीत.. तुमच्या जिल्ह्यासाठी निधी किती मिळाला जाणून घ्या.    

मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये अवकाळी वादळी पाऊस झाला आहे. त्यात शेती पिके व इतर नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. (Government’s helping hand to farmers, funds of 177 crores distributed.)

 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. (Government’s helping hand to farmers, funds of 177 crores distributed.)

         दि.४ ते ८ मार्च व दि.१६ ते १९ मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेती पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

 मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आज राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला. (Government’s helping hand to farmers, funds of 177 crores distributed.)

महसुली विभागनिहाय वितरीत करण्यात आलेला निधी

अमरावती विभाग २४ कोटी ५७ लाख ९५ हजार, नाशिक विभाग ६३ कोटी ९ लाख ७७ हजार, पुणे विभाग ५ कोटी ३७ लाख ७० हजार, छत्रपती संभाजी नगर ८४ कोटी ७५ लाख १९ हजार. एकूण निधी- १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये असा निधी वितरीत करण्यात आले. (Amravati division 24 crore 57 lakh 95 thousand, Nashik division 63 crore 9 lakh 77 thousand, Pune division 5 crore 37 lakh 70 thousand, Chhatrapati Sambhaji Nagar 84 crore 75 lakh 19 thousand. Total fund- 177 crore 80 lakh 61 thousand rupees was distributed.)

Local ad 1