Coronavirus : कोरोना, गोवर रोखण्यसाठी राज्य सरकारची ‘पंचसूत्री’
जिनोम सिक्वेन्सिंग साठी राज्यात सात प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रत्येक आरटीपीसीआर चाचणीतून कोरोना बाधित नमुने जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवा. सर्व जिल्ह्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रिट, व्हॅक्सिनेट आणि कोरोना नियम या पंचसूत्रीचा वापर करावा. (State Government’s ‘Five Sutras’ for Corona and Measles)
सर्व जिल्ह्यांनी टेस्ट- ट्रॅक- ट्रिट -वॅक्सिनेट आणि कोव्हीड अनुरूप वर्तन (Test-track-treat-vaccinate and covid-compliant behavior) या पंचसूत्रीचा वापर करावा. प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जीनोम सिक्वेंस साठी पाठवा, आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व जिल्ह्यांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवरवर आदेश देण्यात आले आहेत. (State Government’s ‘Five Sutras’ for Corona and Measles)
कोरोना संदर्भात चीन, जपान, अमेरिका, कोरिया आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये रुग्णसंखेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer), जिल्हा शल्य चिकित्सक (District Surgeon), आरोग्य अधिकारी मनपा (Health Officer Municipal) आणि राज्यातील सर्व आरोग्य मंडळाचे उपसंचालक (Deputy Director of Health Board) यांची बैठक घेतली. (State Government’s ‘Five Sutras’ for Corona and Measles)
बैठकीत दिलेल्या सूचना
- प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना जीनोम सिक्वेंस साठी पाठवावा..
- प्रत्येक जिल्ह्यात जिनोम सिक्वेन्सिंग साठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
- चीनमधील बीएफ.7 पूर्वी भारतात आढळला आहेत. त्यामुळे या व्हेरीयंटमुळे भीती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.
- यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचाही जिल्हानिन्याय आढावा घेण्यात आला आणि प्रिकॉशन डोसकडे अधिक लक्ष द्या.