...

(GOVERNMENT HOLIDAY) श्री.नृसिंह जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करा ः प्रा.चेपूरवार

हिंगोली ः  दासरी माला दासरी समाजाचे आराध्य कुलदैवत असलेल्या भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जयंती निमित्त २५ मे  रोजी शासकीय सुट्टी जाहीर करा, अशी मागणी दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.गंगाधर चेपूरवार यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (GOVERNMENT HOLIDAY)

कोरोना काळात लॉकडाउनमुळे दासरी माला दासरी समाजाचा पारंपारिक व्यवसाय कुंकू,हळदी, दाशिना, कटलरी गृहोपयोगी सामान विकणे बंद आहे.  खेडी, वाडी, वस्ती, गांव, जत्रा, बाजार फिरून पोटाची खळगी भरणारा हा दासरी समाज सध्य परिस्थितीत हालाखित जिवन जगत असुन, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दासरी माला दासरी समाज राज्यात हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पिढ्या न पिढ्या पासुन शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक,राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रात उपेक्षित व वंचित असलेल्या दासरी माला दासरी समाजाला शासन दरबारी आगामी काळात सामाजिक न्याय हक्क मिळवून देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करु असे, चेपूरवार यांनी सांगितले. (GOVERNMENT HOLIDAY)

 निवेदनावर प्रा.श्री.गंगाधर चेपूरवार, अश्विनी अलडवार-चेपूरवार, पवन सादुलवार सह आदि दासरी समाज बांधवाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Local ad 1