...

खुशखबर..! पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा विचार करताय…

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणांतर्गत (म्हाडा) पुणे मंडळांतर्गत (Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) Pune Division) सप्टेंबर महिन्यात पाच हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत (Online lottery) जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ऑनलाईन प्रणालीचा फटका सोडतीला बसल्याने सोडतीला पुन्हा १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्जदारांना आता ३० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. (Good news..! Thinking of applying for MHADA houses in Pune…)

पुणे म्हाडांतर्गत सहा सप्टेबर रोजी पुणे जिह्यासाठी पाच हजार ४२५, सोलापूर जिह्यात ६९, सांगली ३२ आणि कोल्हापूर जिह्यात ३३७ अशा एकूण पाच हजार ८६३ सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि २० टक्के (सर्व समावेशक) योजनेंतर्गत १०९ योजनां ठिकठिकाणी निवडून सदनिका निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिल्या सोडतीनुसार म्हाडाला केवळ १९ हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले.

 

 

,शुक्रवारी (दि.२०) दुपारी ४ वाजेपर्यंत ६४ हजार ८२२ नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यापैकी ४१ हजार ७६५ अर्जदारांनी पैसे भरून पूर्ण प्रक्रिया केली आहे, जी संख्या जुन्या ऑनलाईन प्रणालीच्या तुलनेत दुपटीने कमी आहे. जुन्या प्रणालीनुसार म्हाडाच्या एका महिन्याच्या सोडतीच्या काळात ५० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त होत असे. नवीन ऑनलाईन प्रणाली पारदर्शक आणि अत्यंत सुलभ असल्याचे सांगण्यात आले असले, तरी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी आणि तांत्रिक दुरुस्त्यांमुळे अर्जदारांना विलंब करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे याचा परिणाम यंदाच्याही ऑनलाईन सोडतीवर झाला असून दुसऱ्यांदा १० दिवस मुदतवाढ देण्याची नामुष्की म्हाडावर आली आहे.

 

अशी असणार मुदतवाढ

  • ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार
  • ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ऑनलाईन पैसे भरता येणार
  • ८ नोव्हेंबर रोजी प्रारूप यादी प्रसिद्धी
  • २४ नोव्हेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर

 

Local ad 1