Good news । नांदेड जिल्ह्यात केवळ “इतके” कोरोना बाधित

नांदेड  :  जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 929 अहवालापैकी 30 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तिसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. (Good news Only “so many” corona affected in Nanded district)

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 469 एवढी झाली असून यातील 99 हजार 177 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 407 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Good news Only “so many” corona affected in Nanded district)

 

Nanded zilla parishad election। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागले जिल्हा प्रशासन

 

बुधवार 9 फेब्रुवारी रोजी गांधीनगर बिलोली येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 686 एवढी आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 1, धर्माबाद 1, हदगाव 2, किनवट 1, लोहा 2, कंधार 1, परभणी 2, लातूर 1, यवतमाळ 1, हिंगोली 4, नागपूर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे बिलोली 2, कंधार 1, मुदखेड 1 असे एकुण 30 कोरोना बाधित आढळले आहे. (Good news Only “so many” corona affected in Nanded district)

 

 जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 111, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 199 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  (Good news Only “so many” corona affected in Nanded district)
 

 

PM Kisan। पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘हे’ बंधनकारक

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 21, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 219, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 145, खाजगी रुग्णालय 20 असे एकुण 407 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Good news Only “so many” corona affected in Nanded district)

Local ad 1