पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांसाठी खुशखबर, आजपासून वाहन शुल्क वसुली बंद

पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यवसायीक (पिवळी पाटी) वाहन (Commercial vehicle) प्रवेश कर वसुल (Business Entry Fee) केला जात होता. खडकी आणि देहू कॅन्टोन्मेंट बोर्डात (Khadki and Dehu Cantonment Board) हे शुल्क सुमारे एक वर्षापूर्वी रद्द करण्यात आले होते. आता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून वसूल केला जाणारे वाहन शुल्क कर रद्द करण्यात आले असून, आजपासून (शुक्रवार) वसुली बंद करण्यात आली आहे. (Good news for vehicles entering Pune Cantonment)

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करण्यासाठी वाहन टॅक्सची वसुली बंद करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून अखेर बोर्डाला गॅझेटच्या स्वरूपात आदेश देण्यात आले आहे. गुरुवारी रात्री १२ वाजल्यानंतर वसुली बंद करण्यात आळी. त्यामुळे आता वाहन प्रवेशासाठी शुल्क द्यावे लागणार नाही. (Good news for vehicles entering Pune Cantonment)

 

 

पुणे कॅन्टोन्मेंट विभागातील (वेहिकल एन्ट्री टॅक्स) वाहन प्रवेश कर हे प्रमुख महसुलाचे साधन होते. कॅन्टोन्मेंटच्या चारही बाजूला 13 ठिकाणी असलेल्या वसुली केंद्रामार्फत बोर्डाला दरवर्षी 13 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. (Good news for vehicles entering Pune Cantonment)

 

 

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार हे साधन बंद झाल्याने बोर्डाच्या उत्पन्नात घट होणार आहे.  मात्र यानिर्णयाचे स्वागत नागरिकांनी केले आहे. बोर्डाची आर्थिक परिस्थिती एकीकडे ढासळली असताना जीएसटी चा वाटा मिळण्यासाठी बोर्ड अनेक वर्षापासून प्रतीक्षेत आहे,

Local ad 1