हुश्श… विद्यार्थ्यांसाठी खुशखबर शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर

  • पुणे : गेली दोन वर्ष कोरोनामुळे (Corona) शाळा ऑनलाईन (School online) आणि काही प्रमाणात प्रत्यक्ष सुरु झाल्या होत्या. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने शाळा पूर्ण क्षमतेने  सुरु होणार आहेत. शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी (Student) आणि पालकांसमोर (parents)  होता.  (Good news for students announcing school start date)

 

खरीप हंगामात पेरणी कधी करावी?, याविषयी राज्याच्या कृषी विभागाने दिली माहिती

 

शिक्षण विभागाने आता शाळा कधीपासून सुरु होणार याची तारीख जाहीर (Maharashtra School Start Date) केली आहे. राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार (School will begin June 13) आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना 15 जून पासून बोलावण्यात येणार आहे. तर विदर्भातील शाळा मात्र 27 जूनपासून सुरू होणार (Schools in Vidarbha, however, will start from June 27) आहेत.

 

तुम्ही शिक्षक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची.. बदल्या कशा होणार जाणून घ्या..

 

शैक्षणिक सत्र 2022 – 23 सुरू करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Good news for students announcing school start date)

 

बार्टी घडवतेय आयएएस : आता 300 विद्यार्थ्यांना मिळणार दिल्लीत युपीएससीचे प्रशिक्षण

 

राज्यातील विद्यार्थ्यांना 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात काळजी घेण्याविषयी माहिती द्यावी लागणार आहे. (Good news for students announcing school start date)

Local ad 1