देगलूर -बिलोली तालुक्यातील (Deglur-Biloli taluka) रस्त्यांचे भाग्य उजळले !

काय म्हणता... तब्बल 208 कोटींच्या रस्ते दुरुस्तींच्या कामांना मंजुरी

नांदेड : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोली विधानसभा मतदरासंघातील राज्य व जिल्हा मार्ग व इतर प्रमुख रस्त्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 208 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Good days came to the roads of Deglur-Biloli taluka 

 

देगलूर मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना कोरोना विषाणुची बाधा होऊन, त्यांचे निधन झाले आहे. त्याठिकाणी आता विधानसभेसाठी पोट निवडणुक होणार असून, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले आहे. कार्यकर्ता मेळावा, जनसपंर्क अभियान राबविले जात आहे. नुकत्यात पारपडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २०८ कोटी रुपयांची ३२ विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. (Deglur-Biloli taluka)

 

पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्य मार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख रूपयांची ४ कामे तर जिल्हा व इतर मार्गांच्या सुधारणेची १७९ कोटी २१ लाख रूपयांच्या २८ कामांचा समावेश आहे. या कामांसाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला आहे. (Deglur-Biloli taluka)

 

मंजूर झालेली ही आहेत कामे
पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये दावणगिर ते लोणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९ कोटी रूपये, बिलोली ते कुंडलवाडी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १५ कोटी रूपये, राज्य मार्ग २६८ वरील पुलाचे बांधकाम अंदाजित खर्च ४ कोटी रूपये, राज्य मार्ग २२५ वर दुभाजकाचे काम अंदाजित खर्च ७५ लाख रूपये, भोकसखेडा ते कावळगाव मार्गाची सुधारणा व कावळगावनजिकच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च १० कोटी रूपये, हिप्परगा ते देगलूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, बल्लूर ते माळेगाव मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.७० कोटी रूपये, प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०६ ते राज्य सीमा तसेच मरतोळी गावातील सीसी रस्ता अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, खुतमापूर ते राज्यसिमा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.(Deglur-Biloli taluka)

 

भुतन हिप्परगा ते भुतन हिप्परगा फाटा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.१० कोटी रूपये, खतगाव ते कोटेकल्लूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २ कोटी रूपये, क्षीरसमुद्र ते बेंबरा तांडा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ७ कोटी रूपये, येडूर ते मानूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.८६ कोटी रूपये, शिळवणी हाणेगाव ते भुतन हिप्परगा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.३० कोटी रूपये, शहापूर ते करेमलकापूर मार्ग सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३.७८ कोटी रूपये, तुंबरपल्ली ते शिळवणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रूपये, चैनपूर ते शहापूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १.३५ कोटी रूपये बिलोली शहर वळणरस्ता भूसंपादन अंदाजित खर्च १७ कोटी रूपये, भोसी ते राज्य मार्ग क्र. २२५ पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा अंदाजित खर्च ४ कोटी रूपये मंजुर केले आहेत.

 

लोहगाव ते किनाळा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रूपये, हुनगुंदा ते शिरसखोड मार्गाच्या सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३५ कोटी रूपये, खैरगाव ते लोहगाव मार्गाची सुधारणा अंदाजित २ कोटी रूपये, डोणगाव खु. ते डोणगाव बु. मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३ कोटी रूपये, बिलोली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४२ वरील गोदावरी नदीच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, बिलोली तालुक्यातील मांजरा नदीवरील पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, कांगठी ते बेळकोमी व रुद्रापूर ते बामणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ८.८५ कोटी रूपये, दुगाव आणि आरळी ते दौर तसेच दौर ते रामा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९.४७ कोटी रूपये, बेटमोगरा ते आळंदी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १२.८० कोटी रूपये, लघूळ ते सगरोळी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५.१० कोटी रूपये ही कामे समाविष्ट आहेत. (Deglur-Biloli taluka)

Local ad 1