गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त (Goa-made liquor stocks confiscated)
पुणे : पुरंदर तालुक्यातील निरा गावच्या हद्दीतून मद्याची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. दोन च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात एका ट्रकमध्ये गेवा बनावटीचे मद्य आणि ट्रक व चारचाकी वाहनासह 49 लाख 9 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर चार आरोपिंना अटक करण्यात आली आहे. (Goa-made liquor stocks confiscated)
लोणंद – निरा रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज विसावा ठिकाणाच्या समोरील रस्त्यावर संशयीत ट्रक क्र. एम.एच. 18 ए.ए. 8355 यास पथकातील अधिकाऱ्यांनी थांबविला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये मागच्या बाजूला 200 लीटर क्षमतेचे रिकामे लोखंडी बॅरल असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र बॅरलच्या मागे गोवा निर्मित मद्याचे बॉक्स असल्याचे दिसून आले. ट्रकचालकाकडे चौकशी केली असता ट्रकसोबत अजूनही एक चारचाकी वहान असल्याची माहिती समोर आली. जीजे 01 के.वाय. 9848 क्रमांकाच्या कारमधील दोघांना ताब्यात घेतले. ट्रक चालक राजेश लक्ष्मण लोहार (वय 42 वर्ष रा. 426, ग्रामपंचायत विहिर, मु.पो. हिसाळे जि. धुळे), सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला (वय 25 वर्ष रा. कर्तापुर घुमेंरा जि. जालंदर पंजाब), राजू सुरसिंग सोलंकी (वय 36 वर्षे रा. गायत्री आश्रम, जांभली ता. शेंदवा जि. बडवानी मध्यप्रदेश (ट्रकचा क्लीनर) व शैलेशकुमार रामकृपाल कौरी (वय-25 वर्ष रा. 391, नवीन फौजदारचाळ, जीडी शाळारोड, सैजपुर बोगा नरोडा, अहमदाबाद गुजरात) या चौघांना अटक करण्यात आली. (Goa-made liquor stocks confiscated)
ट्रकमधील मद्याची तपासणी केली असता रॉयल ब्लॅक व्हीस्कीचे 180 मि.ली. क्षमतेचे 30 बॉक्स, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे 180 मि.ली. क्षमतेचे 275 बॉक्स, रॉयल चॅलेंजर व्हीस्कीचे 750 मि.ली. क्षमतेचे 50 बॉक्स, टयुबर्ग स्ट्राँग प्रिमिअम बिअरचे 500 मि.ली. क्षमतेचे 75 बॉक्स, किंगफिशर स्ट्राँग प्रिमिअम बिअरचे 500 मि.ली. क्षमतेचे 50 बॉक्स असे एकूण 480 बॉक्स जप्त करण्यात आले. अटक आरोपींना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई आयुक्त, कांतीलाल उमाप, पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे तसेच उपअधीक्षक, संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ए. जी. बिराजदार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. 2 पुणे यांनी केली. दुय्यम निरीक्षक विकास थोरात, एस. के. कानेकर संतिश इंगळे, प्रशांत धाईंजे, गणेश नागरगोजे, संतोष गोंदकर, जवान एस. बी. मांडेकर, नवनाथ पडवळ, केशव वामने, बी. आर. सावंत, व महिला जवान मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला. (Goa-made liquor stocks confiscated)