Gmail। तुमच्याकडून चुकून मेल सेंड झाला तर घाबरु नका !

Gmail । मित्र- मैत्रिणींना किंवा कार्यालयीन कामासाठी मेल (Mail) पाठवला जातो.  पण काही वेळेला नजरचुकीने चुकीच्या आयडीवर मेल पाठवला जातो. त्यामुळे चिंता वाढते. पण आता तुम्ही चुकीच्या मेल आयडीवर पाठवला मेल  तुम्हांला परत घेता येतो. परंतु त्यासाठी मेल पाठवल्यानंतर 30 सेंकदाच्या आत तुम्हाला प्रक्रिया करावी लागलणार आहे.(Gmail । Don’t worry if you send mail by mistake !)

 

 

अनेकदा तुमच्या Gmail वरुन चुकीच्या आयडीवर मेल पाठवता. अनेकवेळा लोक वैयक्तिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या कोणाला तरी ईमेल करतात. अशी चुक होण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मेल सर्च करता, त्यावेळी तुम्ही ड्रॉप डाउनमध्ये सारखीच नावे असलेला चुकीचा ईमेल आयडी निवडता.  किंवा दुसरे तुमच्याकडून मेल टाईप करताना चूक होते. यामुळे तो मेल दुसऱ्याच मेल आयडीवर जातो. (Gmail Don’t worry if you send mail by mistake !)

 

 

तुमच्याकडून जर चुकून दुसऱ्या मेल आयडीवर मेल गेला असेल तर घाबरण्याची गरज नाही. Gmail तुम्हाला पाठवलेला मेल परत घेण्याची परवानगी देतो. मात्र, हा पर्याय सक्रिय करणे आवश्यक आहे. एकदा पर्याय सक्रिय झाल्यानंतर, आपण 30 सेकंदांच्या आत पाठवलेला मेल रिकॉल करू शकता.  जेव्हा Gmail वरुन एखाद्याला मेल पाठवला जातो, तेव्हा तुमच्या स्क्रीनच्या तळाशी डाव्या बाजूला Undo आणि View मेसेजचा पर्याय येतो. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर Undo वर क्लिक करा. पाठवलेला मेल परत येईल. आवश्यक बदल केल्यानंतर तुम्ही तो मेल रद्द करु शकता किंवा त्याच ईमेल पत्त्यावर पुन्हा पाठवू शकता. (Gmail Don’t worry if you send mail by mistake !)

Undo चा पर्याय असा सक्रिय करा

  • प्रथम Gmail वर लॉग इन करा
  • Gmail च्या Settings पर्यायावर क्लिक करा
  • सर्व सेटिंग्ज पाहा वर क्लिक करा
  • General Settings मध्ये Undo Send चा पर्याय दिसेल
  •  रद्दीकरण कालावधीत 5,10,20,30 सेकंदांचा पर्याय निवडावा लागेल.

 

Local ad 1