नांदेड : शहरातील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हात्तेच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्यात आले. तरी तपास लागू शकत नाही, ही खेदाची बाब असून, तपास सीबीआयकडे वर्ग करा, अशी मागणी नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. तसेच 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा ही खासदार चिखलीकर (MP Pratap Patil Chikhlikar) यांनी दिला आहे. (Give Sanjay Biyani murder to CBI: Pratap Patil Chikhlikar)
नांदेदमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार चिखलीकर बोलत होते. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले, चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, भाजपा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. (Give Sanjay Biyani murder to CBI: Pratap Patil Chikhlikar)
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या झाली. त्यास १२ दिवस झाल्यानंतरही पोलीस तपास लावण्यात अपयशी ठरली आहे. या खुनाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटीला कोणतेही धागे ढोरे हाती लागले नाहीत. उलट तपासासाठी आम्हाला अजून वेळ द्या, अशी मागणी करत आहेत. यावरून एसआयटीला या गुन्ह्याचा तपास लावणे शक्य होईल असे वाटतं नाही. त्यामुळे हा गुन्हा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी केली. (Give Sanjay Biyani murder to CBI: Pratap Patil Chikhlikar)
संजय बियाणी यांच्यासारखी अन्य कुनचीही हत्या होऊ नये, संजय बियाणी याणी अनेक सामाजिक उपक्रम राबवून गीर गरिबांना घरे मिळून दिली. या घटनेबाबत मागील काही दिवसापूर्वी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेवून सांगितले आहे. त्यांनी तपास करण्याबद्दल मला ग्वाही दिली आहे. या घटनेचा तपास सीबीआयकडे दिला नाहीतर येणाऱ्या २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल, या मोर्चात भाजपासह या घटनेच्या निषेध करणाऱ्या सर्वानी सहभागी होऊन गुन्हेगारीला आळा घालण्याच्या निर्णयासाठी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी नांदेडकरांना केले. (Give Sanjay Biyani murder to CBI: Pratap Patil Chikhlikar)