पुणे : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जंयती निमित्त नाचुन नव्हे वाचुन मोठे होऊ या उद्देशातुन प्रभाग क्रं 39 महर्षिनगर मार्केटयार्ड मध्ये भाजप पक्ष व एकता सेवा प्रतिष्ठाण यांच्या माध्यमातुन भागातील सामाजिक व दलित चळवळीतील १३२ सामाजिक कार्यकर्तेचा भारताचे संविधान पुस्तक स्वरूपात भेट देऊन सन्मान करण्यात आला. (Gift of Constitution of India book to 132 social activists)
या कार्याची सुरुवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाली. यावेळी पोपटराव माने, सागर निंबाळकर, गणेश शिवशरण, शाम आवळे, पप्पु कांबळे, रविद्र मोरे,संदीप कांबळे,प्रणव क्षिरसागर, विनायक कडवळे, माऊती कांबळे, विकास मोरे, आकाश सरोदे, बाळासाहेब बनसोडे, नितीन गायकवाड, रूपेश सोरोदे, समिर कसबे, अनिल विसरे नितीन गायकवाड, सचिन खंडागळे अशा अनेक चळवळ मधील कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश होता. (Gift of Constitution of India book to 132 social activists)
Related Posts
यावेळी गणेश शेरला म्हणाले, प्रभाग क्रमांक ३९ मध्ये असंख्य दलित चळवळीचे कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही सामाजिक कार्य करतो आणि या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे हेच आमचे भाग्य आहे. काही ज्येष्ठांचा सन्मान घरोघरी जाऊन करण्याचा आम्ही संकल्प केला. (Gift of Constitution of India book to 132 social activists)
याप्रसंगी भागातील अनेक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रम यशस्वी होण्यासाठी एकता प्रतिष्ठाणच्या सचिन खंडागळे महेश साळुंखे विनोद कांबळे मारुती कांबळे नितीन गायकवाड, रूपेश राजभर,राहुल नाटेकर,संजय साठे,हेमंत जगताप,महेश सांळुके, नजीर शेख यांनी परिश्रम घेतले. (Gift of Constitution of India book to 132 social activists)