...

Ayushman Golden Card ।आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळवा अन् रुग्णालयातील खर्चातून चिंतामुक्त व्हा..!

Ayushman Golden Card । नांदेड : सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असलेली योजना म्हणून आयुष्यमान भारत योजने कडे पाहिले जाते. आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडे असणे या योजनाच्या लाभासाठी आवश्यक आहे.

Ayushman Golden Card । नांदेड : सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असलेली योजना म्हणून आयुष्यमान भारत योजने कडे पाहिले जाते. आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडे असणे या योजनाच्या लाभासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या लोकांना अजूनही आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळाले नाही अथवा ज्यांनी अजूनही या कार्डसाठी अर्ज भरले नाहीत अशा व्यक्तींसाठी संपूर्ण जिल्हाभर विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. (Get Ayushman Golden Card and be worry free)

 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था (शाळा), अंगणवाडी केंद्र, सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मुख्य ठिकाण, चौक, रेशन दुकाने, सेतु सुविधा केंद्र, गर्दीची ठिकाण दिनांक 28 डिसेंबर रोजी ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्ह्यात किमान एक लाख आयुष्यमान कार्ड लोकांपर्यंत पोहोचावेत यादृष्टिने आरोग्य विभाग व सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून नियोजन केले गेले आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी मोफत आरोग्य सुविधांची भूमिका महत्वाची आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही उपचार, शस्त्रक्रिया पासून वंचित राहू नये यासाठी राज्यस्तरावरुन महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संलग्न रुग्णालयातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया लाभ दिला जातो. या योजनेचे गावनिहाय लाभार्थी यादीतून डाऊनलोड करणे, गोल्डन कार्ड तयार करणे व नागरिकांमध्ये जागृती करुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती अजून बिकट होणार नाही व योग्य उपचार मिळून त्यांना आरोग्य प्राप्ती होईल असा या योजनेमागचा उद्देश आहे.

Local ad 1